नेरी येथे विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:22 IST2021-09-06T04:22:08+5:302021-09-06T04:22:08+5:30
कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या नेरी, ता. पाचोरा येथील ओम गणेश पाटील (१३) या मुलाचा विजेच्या धक्क्याने ...

नेरी येथे विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या नेरी, ता. पाचोरा येथील ओम गणेश पाटील (१३) या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रोजी दुपारी २ वाजता घडली. शेतकरी गणेश पाटील यांच्या शेतात मजूर काम करीत असताना मजुरांना पाणी देण्यासाठी मुलगा ओम हा जात होता. महापुरामुळे शेतात विद्युत तार पडलेली होती. या तारेला ओम याचा स्पर्श झाल्याने विजेचा झटका बसला. त्याला चाळीसगाव येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ओम हा एकुलता मुलगा होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तीन-चार दिवसांपूर्वी परिसरात झालेला पाऊस आणि नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल जमिनीवर पडलेले आहेत. गणेश पाटील यांच्या शेतातदेखील विद्युत तार पडलेली होती. या तारेचा विद्युत पुरवठा सुरूच होता. यामुळे ही घटना घडल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.