जिल्ह्यास मिळाल्या १३ रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:31+5:302021-06-16T04:22:31+5:30

अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणाऱ्या रुग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर ...

13 ambulances received by the district | जिल्ह्यास मिळाल्या १३ रुग्णवाहिका

जिल्ह्यास मिळाल्या १३ रुग्णवाहिका

अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणाऱ्या रुग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रुग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रुग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत तर उर्वरित रुग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.

या रुग्णवाहिकांचे जिल्हा रुग्णालयात लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून या रुग्णवाहिका शासकीय सेवेसाठी अर्पित केल्या. यात १३ रुग्णवाहिका असून त्या जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयांना प्रदान करण्यात आल्या आहेत. तर एक मोठ्या वाहनातील अद्ययावत सामग्रीने सज्ज असणारी मोबाईल मेडिकल युनिट ही रुग्णवाहिका आहे. ही रुग्णवाहिका जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर आदी तालुक्यांमधील आदिवासी बहुल भागांमध्ये नियमितपणे फिरवण्यात येणार आहे. यामुळे दुर्गम भागातील रुग्णांनादेखील थेट त्यांच्या पाड्यावर अद्ययावत उपचार मिळणार आहेत.

१३ रुग्णवाहिका लोकार्पण

जिल्ह्यातील पाल, रावेर, अमळनेर या ग्रामीण रुग्णालयाला तसेच मुक्ताईनगर व जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयाला अशा ५ ठिकाणी तर प्राथमिक आरोग्य केंद्र मंडळ (अमळनेर), केंद्र कजगाव (भडगाव), रांजणगाव व उंबरखेड (चाळीसगाव), अडावद व वैजापूर (चोपडा), वाकोद (जामनेर), लोहारा (पाचोरा) अशा ८ प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका मिळाल्याने त्या-त्या परिसरातील रुग्णांसाठी दिलासा मिळणार आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण, आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, जि. प. चे आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जि. प. सदस्य अमित पाटील, दीपक राजपूत, उद्धव मराठे, टेम्पो फोर्स कंपनीचे संचालक चंद्रशेखर अग्रवाल, आतिश सोनवणे, सेवा अभियंता विवेक नारखेडे, मोहाडी सरपंच व आरोग्य डम्पी सोनवणे डॉक्टर व वाहनचालक उपस्थित होते.

===Photopath===

140621\14jal_3_14062021_12.jpg

===Caption===

लोहारा गटाचे माजी जि. प. सदस्य दिपकसिंग राजपूत यांना लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिनीची चावी देताना गुलाबराव पाटील व जि. प. अध्यक्षा रंजना पाटील.

Web Title: 13 ambulances received by the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.