१२५६ शिक्षक, शिक्षकेतरांनी अजूनही घेतली नाही लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:55+5:302021-09-24T04:20:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी ...

1256 teachers have not yet been vaccinated | १२५६ शिक्षक, शिक्षकेतरांनी अजूनही घेतली नाही लस

१२५६ शिक्षक, शिक्षकेतरांनी अजूनही घेतली नाही लस

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, अजूनही जवळपास १ हजार २५६ शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचा अद्याप एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे शिक्षकांनी लवकरात लवकर लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूने जळगाव शहरासह जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातले होते. दिवसेंदिवस बाधितांसह मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर जुलै महिन्यापासून ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सद्य:स्थितीला ग्रामीण भागातील माध्यमिकच्या ७९७ शाळांपैकी ५४८ शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू होताना, शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले होते; परंतु ग्रामीण भागातील १ हजार २५६ शिक्षक, शिक्षकेतरांनी अद्याप कोरोना लसीकरण करून घेतलेले नाही.

११ हजार ५६६ जणांनी घेतला पहिला डोस

इयत्ता आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागातील ७९७ माध्यमिक शाळांमध्ये १२ हजार ८३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ११ हजार ५६६ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ७ हजार ९८७ जणांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. दरम्यान, राज्य शासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस घेण्याची सक्ती केली असतानाही १ हजार २५६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

या तालुक्यातील शाळांची दारे उघडली...

अमळनेर (५४), भडगाव (२८), भुसावळ (१९), बोदवड (१२), चाळीसगाव (५३), चोपडा (४२), धरणगाव (३१), एरंडोल (२८), जळगाव (३६), जामनेर (२९), मुक्ताईनगर (१७), पाचोरा (५९), पारोळा (३८), रावेर (५७), यावल (४५).

--------

- ग्रामीण भागातील एकूण शाळा : ७९७

- सुरू असलेल्या शाळा : ५४८

- शिक्षक, शिक्षकेतर संख्या - १२,८३२

- पहिला डोस घेतलेले : ११, ५६६

- दोन्ही डोस घेतलेले : ७,९८७

------

Web Title: 1256 teachers have not yet been vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.