जिल्ह्यात सरासरीच्या १२१ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:33+5:302021-07-07T04:21:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात ६ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा १२१ टक्के पाऊस झाला आहे. मात्र मुक्ताईनगर, अमळनेर आणि चोपडा ...

जिल्ह्यात सरासरीच्या १२१ टक्के पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात ६ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा १२१ टक्के पाऊस झाला आहे. मात्र मुक्ताईनगर, अमळनेर आणि चोपडा या तीन तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओल बघूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागातील तज्ज्ञांनी दिला आहे.
जिल्ह्यात ७२ टक्के खरीप पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कृषी विभाग सातत्याने जिल्ह्यात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन करत होता. मात्र आतादेखील शेतकऱ्यांनी हलकी, मध्यम आणि भारी अशी तीनही प्रकारच्या जमिनीत पेरणी करताना ओल बघूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला देण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या कापूस, ज्वारीचे क्षेत्र मोठे आहे. ६ जुलैपर्यंत जळगाव तालुक्यात १५१.३ मिमी एवढा पाऊस झाला आहे, तर त्यासोबतच सर्वाधिक पाऊस पारोळा तालुक्यात २२०.३ मिमी, तर चाळीसगाव तालुक्यात २०६.२ मिमी एवढा पाऊस झाला आहे.
जून २०२१
जळगाव- १५०.८
भुसावळ- १६८.१
यावल- १५३.३
रावेर- १४१.२
मुक्ताईनगर- ९३.१
अमळनेर- ८५.८
चोपडा- ८७.९
एरंडोल- १५४.९
पारोळा- २१०.७
चाळीसगाव- २००.६
जामनेर- १८२.१
पाचोरा- १६७.७
भडगाव- १५८.४
धरणगाव- १४२.७
बोदवड- १७४.१
एकूण जिल्हा १४९.७
जून महिन्याचा सरासरी पाऊस - १२३.७
जून २०२०
जळगाव - १९५.२
भुसावळ- १९५.१
यावल- १९८.५
रावेर- १८९.७
मुक्ताईनगर- १९६.५
अमळनेर- २०९.३
चोपडा- ३१९.२
एरंडोल - ----
पारोळा- १७७.७
चाळीसगाव
जामनेर १७३.९
पाचोरा २२४.५
भडगाव --
धरणगाव १६०.७
बोदवड
जून २०१९
जळगाव - ७६.५
भुसावळ - ८०.६
यावल - ७८
रावेर ११६.२
मुक्ताईनगर - १०७.१
अमळनेर ६८
चोपडा - ३८.२
एरंडोल - ८८.३
पारोळा ७०.५
चाळीसगाव ६८.५
जामनेर १७२.४
पाचोरा ११५.२
भडगाव ६५.७
धरणगाव ४२.२
बोदवड ९६.६