एनसीसी कर्नलला १२ हजारात गंडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST2021-07-04T04:12:54+5:302021-07-04T04:12:54+5:30

अमळनेर : महाराष्ट्र एनसीसी ४९ बटालियनचे कर्नलच्या क्रेडिट कार्डवरून अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन पैसे काढून फसवणूक केल्याची घटना २७ रोजी ...

12,000 to NCC Colonel | एनसीसी कर्नलला १२ हजारात गंडवले

एनसीसी कर्नलला १२ हजारात गंडवले

अमळनेर : महाराष्ट्र एनसीसी ४९ बटालियनचे कर्नलच्या क्रेडिट कार्डवरून अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन पैसे काढून फसवणूक केल्याची घटना २७ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेच्या दरम्यान घडली.

विवेक जोगिंदर कुमार भटारा हे गेल्या एक वर्षांपासून महाराष्ट्र एनसीसी ४९ बटालियन येथे कर्नल पदावर नोकरीला असून प्रताप महाविद्यालयाजवळ राहतात. त्यांना पुणे येथील रत्नाकर बँकेने प्लॅटिनम क्रेडिट कार्ड दिले असून २७ रोजी त्यांना ०२२- ४१४३१५६६ या क्रमांकावरून फोन आला आणि त्याने तुमच्या खात्यातून २ हजार रुपये काढले गेल्याचे सांगितले. भटारा यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ४ हजार ४९९ रुपये दोनवेळा, २ हजार व नंतर ९०० रुपये असे एकूण ११ हजार ८९८ रुपये त्यांच्या परवानगीशिवाय काढण्यात आल्याचे संदेश प्राप्त झाले.

खात्री झाल्यावर भटारा यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दिल्याने दूरध्वनी क्रमांकाच्या मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.

Web Title: 12,000 to NCC Colonel