Shocking News: मुक्ताईनगर शहरातील जे. ई. स्कूलमध्ये सातव्या इयत्तेतील चैतन्य शंकर मराठे (१२, रा. मुंढोळदे, ता. मुक्ताईनगर) या विद्यार्थ्यांचा शाळेत अचानक मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
चैतन्य हा बुधवारी मुंढोळदे येथून बसने शाळेत आला होता. सुट्टीत चैतन्यने जेवण केले आणि त्यानंतर तो मित्रांसोबत खेळत होता. थोड्या वेळाने तो बाकावर बसल्यानंतर काही क्षणांतच त्याची प्रकृती खालावली. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी त्याला रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चैतन्यच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंदाजानुसार, हृदयविकार किंवा मेंदूतील रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.