खेळताना वीज तारांना स्पर्श झाल्याने १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST2021-07-07T04:19:15+5:302021-07-07T04:19:15+5:30

जळगाव : मुलांसोबत घराच्या धाब्यावर खेळत असताना गावातील मु‌ख्य वीज वाहिनीच्या तारांना स्पर्श होऊन रितेश मुकेश वासकले (१२,रा.टाकळी, ता.घुसगाव, ...

12-year-old dies after touching power lines while playing | खेळताना वीज तारांना स्पर्श झाल्याने १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

खेळताना वीज तारांना स्पर्श झाल्याने १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

जळगाव : मुलांसोबत घराच्या धाब्यावर खेळत असताना गावातील मु‌ख्य वीज वाहिनीच्या तारांना स्पर्श होऊन रितेश मुकेश वासकले (१२,रा.टाकळी, ता.घुसगाव, जि.बडवाणी, मध्य प्रदेश) या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी कठोरा, ता.जळगाव येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील मुकेश प्रताप वासकले हे पत्नी व तीन मुलांसह रोजगारानिमित्त कठोरा येथे आले आहेत. भीकन श्रीपत पाटील यांच्याकडे ते कामाला असून गावातच वास्तव्याला आहेत. रविवारी सायंकाळी त्यांचा मुलगा रितेश हा इतर मुलांसोबत खेळत असताना धाब्यावर चढला. तेव्हा धाब्यावरुन गेलेल्या वीज तारांना रितेशचा स्पर्श झाल्याने तो फेकला गेला. यात भाजला गेल्याने शेतमालक व कुटुंबियांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. रात्री उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार ईश्वर लोखंडे यांनी पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह वडिलांच्या ताब्यात दिला. मुकेश वासकले सहा वर्षापासून कठोरा येथे वास्तव्याला आहेत.

Web Title: 12-year-old dies after touching power lines while playing