शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

१२ मतीवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:48 AM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रा.अनिल सोनार

नको तेव्हा दत्त म्हणून समोर उभा राहणार नाही तो नाना कसला आणि नको तेव्हा, नको ते प्रश्न विचारणार नाही, तो तर नाना असूच शकत नाही. समोरच्याच खुर्चीत बसकण मारत नानाने विचारलं.’ अहो विद्वान, मुत्सद्दी म्हणजे काय? आणि आमच्यात प्रश्नोत्तरं झालीत ती पुढीलप्रमाणे-‘मला काय माहीत?’‘तू विद्वान आहेस ना.’‘नाही मी विनोदी लेखक आहे.’‘अरे पण विचारवंत तरी आहे की नाही?’विनोदी लेखक कधी विचारवंत असतो का?’‘अरे, पण तू चिंतन, मनन करत, असशीलच की.’‘नाही, मी फक्त विनोद करतो.’‘पण अंतर्मुख होऊन विचार तर करत असशील ना?’‘अंतर्मुख? ते काय असतं?’‘अरे, हास्य खर्डेघाषा. तुला काय म्हणायचं आहे की हसणारी, हसवणारी माणसं वरवरच्या गोष्टी बघणारी, थिल्लर, उथळ असतात? तात्त्विक विचार करण्याची त्यांच्या बुद्धीत ताकदच नसते?’‘वकूबच नसतो रे तेवढा आमच्या सारख्यांचा’‘म्हणजे विनोदी लेखक विद्वान, विचारी असूच शकत नाही?’‘कसं बोलतोस. मला अगदी आरशात स्वत:चा चेहरा बघितल्यासारखं वाटलं बघ.’‘मुर्खा, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे यांचं काय?’‘नाना, तू त्यांना विचारलेलं नाहीस रे, की मुत्सद्दी म्हणजे काय? मला विचारलं आहेस.’‘त्यांना विचारायला जायची गरज नाही. अत्रे साहेबांनी लिहूनच ठेवलंय की ज्यांच्या अंत:करणातून मानव जातीबद्दलचा सहानुभूतीचा झरा एकसारखा वाहतो आहे, आणि सर्व मानवजात सुखी आणि आनंदी व्हावी, अशी ज्याच्या अंत:करणाला तळमळ लागून राहिली आहे, अशा उमद्या आणि दिलदार माणसालाच आयुष्यात विनोदाचा साक्षात्कार होतो. हलकट आणि लबाड माणसे काही विनोदी होऊ शकत नाहीत.’‘नाना, कादर खान, शक्ती कपूर प्रभावळीला विसरू नकोस.’‘मूर्खा, मी ओंगळ, बटबटीत, बिभत्सपणाबद्दल बोलत नाहीये. निकोप, सुसंस्कृत, हृद्य विनोदाबद्दल बोलतोय. गांभिर्याचे किंवा विद्वत्तेचे, जसे खोटे सोंग आणता येते, तसे विनोदाचे कृत्रिम अवसान, आणता येत नाही. कळलं? म्हणून मी तुला विचारी विद्वान वगैरे समजून विचारलं की मुत्सद्दी म्हणजे काय?’‘समजा, मी तुला उत्तर दिलं आणि तुझी अस्मिता दुखावली गेली, आणि तू बाह्या सावरत माझ्या अंगावर धाऊन आलास तर?’‘नाही येणार. बोल’‘नाना, मित्रा, तू नुसता भोट राहिलास. इतका वेळ मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर न देता, तुला खेळवत राहिलो ना, यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात... म्हणशील तर मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंही आहे, आणि म्हणशील तर थेट उत्तर देणं खुबीनं टाळलंही आहे. आपल्या महाराष्ट्रात एक आदरणीय व्यक्ती आहे तिच्या जीवनचरित्राचा अभ्यास कर, म्हणजे मुत्सद्दी म्हणजे काय ते तुला आपोआप कळेल. तुलाही मुत्सद्दी होता येईल. मात्र त्यासाठी नेहमीपेक्षा बारा पट जास्त बुद्धी आपल्याजवळ असायला हवी. त्यांच्यावरची माझी रचना ऐक-कधी पासंगासही ना पुरे हा १२ मतीवाला,कधी गोदामे भरून उरे हा १२ मतीवाला.टीकेची झोड हा साही, तरीही मौना ना सोडी,खरा तरबेज मुत्सद्दी ठरे हा १२ मतीवाला.कलेच्या अंतरंगी शिरुनी लीलया साक्षेपी बोलेविस्मित मर्मज्ञा बघूनी हसे हा १२ मतीवाला.कुणा वाटे क्रिकेटचा, कुणा वाटे नाटकवालाकृषीतज्ञांस शेतीतच दिसे हा १२ मतीवाला.बोलला एक, दुजे करतो. नसोनी सर्वत्रच असतो.सर्वांना दशांगुळे पुरुनी उरे हा १२ मतीवाला.-प्रा.अनिल सोनार, धुळे

टॅग्स :literatureसाहित्यDhuleधुळे