आपत्तीग्रस्तांसाठी १२ लाखांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:08+5:302021-07-23T04:12:08+5:30

जळगाव : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना किंवा जखमी झालेल्यांसाठी मदत निधी मंजूर केला आहे. त्यात जळगाव विभागात ...

12 lakh fund sanctioned for disaster victims | आपत्तीग्रस्तांसाठी १२ लाखांचा निधी मंजूर

आपत्तीग्रस्तांसाठी १२ लाखांचा निधी मंजूर

जळगाव : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना किंवा जखमी झालेल्यांसाठी मदत निधी मंजूर केला आहे. त्यात जळगाव विभागात १२ लाख १२ हजार ७०० रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये दिले जाणार आहेत. तर एका जखमी व्यक्तीलाही यातून मदत केली जाणार आहे. काही दिवसांपुर्वी वीज कोसळून दोन जण तर नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने एक जणाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना मदत म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकांनुसार ही मदत देण्यात येत आहे. नाशिक विभागाला मिळून ७२ लाख ६३ हजार ७०० रुपये मंजूर करण्यात आले आहे.

Web Title: 12 lakh fund sanctioned for disaster victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.