११ आजी-माजी नगरसेवकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:12 IST2017-03-03T00:12:30+5:302017-03-03T00:12:30+5:30

मोफत बससेवा प्रकरणी सुनावणी: २३ रोजी होणार कामकाज

11th Aajee-former corporators attend | ११ आजी-माजी नगरसेवकांची हजेरी

११ आजी-माजी नगरसेवकांची हजेरी

जळगाव: मोफत बससेवा योजनेबाबत दिलेल्या नोटीसनुसार गुरुवारी बोलविलेल्या १२ पैकी ११ नगरसेवकांनी स्वत: आपल्या वकिलांसह आयुक्तांच्या दालनात हजेरी लावली. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी २३ मार्च ही तारीख देण्यात आली आहे.
दरम्यान आयुक्त बैठकीसाठी मुंबईला गेल्याने ३ व ४ रोजी सुनावणीसाठी बोलविलेल्या आजी-माजी नगरसेवकांची सुनावणी ६ रोजी होणार आहे.
तत्कालीन नपाने राबविलेल्या विविध योजनांमध्ये नगरपालिकेचे नुकसान झाल्याचा ठपका लेखापरिक्षणात ठेवण्यात आलेला असल्याने त्याअनुषंगाने न्यायालयाच्या आदेशाने आयुक्तांसमोर या योजनांचे ठराव मंजूर करणाºया नगरसेवकांची सुनावणी घेण्यात येत आहे.

Web Title: 11th Aajee-former corporators attend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.