शिक्षक दिनानिमित्त ११ शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:54+5:302021-09-05T04:19:54+5:30
जळगाव : येथील दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र व डॉ. भूषण मगर पाटील फाउंडेशन पाचोरा यांच्यातर्फे ‘शिक्षक दिना’निमित्त शिक्षकांचा सत्कार ...

शिक्षक दिनानिमित्त ११ शिक्षकांचा सन्मान
जळगाव : येथील दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र व डॉ. भूषण मगर पाटील फाउंडेशन पाचोरा यांच्यातर्फे ‘शिक्षक दिना’निमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे शिक्षण व क्रीडा सभापती रवींद्र पाटील, वित्त लेखाधिकारी कपिल पाटील, प्रा. आर.व्ही. पाटील, प्रा. वासुदेव पाटील आणि शक्ती महाजन यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी जयश्री पाटील, कल्पना देवरे, मनीषा पाटील, सुवर्णा भोळे, सुनीता वाघ, मनीषा चौधरी, हेमंत पाटील, प्रवीण धनगर, विजय विसपुते, जितेंद्र शिंदे, पंकज सूर्यवंशी, मेघश्याम शिंदे या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील यांनी तर आभार उमेश सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र टोंणगे, राजेंद्र वाघमारे यांनी सहकार्य केले.