शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विम्याचे ४४ लाख देण्यासाठी उकळले पावणे अकरा लाख

By विजय.सैतवाल | Updated: June 21, 2024 22:29 IST

ऑनलाईन फसवणूक : प्रोसेसिंग व ट्रॉन्सफर फीच्या नावाखाली घेतली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : वडिलांच्या नावे असलेली विम्याची ४४ लाख रुपयांची रक्कम देण्यासाठी रेल्वे विभागातील कर्मचाऱ्याची १० लाख ७४ हजार १९४ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ८ मार्च ते २० जूनदरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथे रेल्वेमध्ये टेक्निशीयन म्हणून कार्यरत असलेले प्रसाद किशोर कुलकर्णी (३६, रा. तुळशीनगर, भुसावळ) यांना ८ मार्च रोजी मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या विम्याची ४४ लाख रुपयांची रक्कम द्यायची असल्याचे सांगण्यात आले. यात भालचंद्र व रामचरण असे नावे सांगणाऱ्या दोन जणांनी भारतीय राजमुद्रा असलेले बनावट कागदपत्रे पाठवून कुलकर्णी यांचा विश्वास संपादन केला.

ही रक्कम मिळण्यासाठी प्रोसेसिंग फी, ट्रान्सफर फी असे वेगवेगळे कारणे सांगून वेळोवेळी पैशाची मागणी केली. त्यात वडिलांचे निधन झाले असल्याने कदाचित त्यांनी विमा काढला असावा, असे कुलकर्णी यांना वाटले. त्यामुळे समोरील व्यक्तींनी वेळोवेळी वेगवेगळ्या फीच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण १० लाख ७४ हजार १९४ रुपये स्वीकारले.

एवढी फी देऊनही कोणतीही रक्कम मिळत नसल्याने आपली फस‌वणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रसाद कुलकर्णी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भालचंद्र व रामचरण नाव सांगणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत