108 कोटी रुपये थकीत कर्जाचे होणार निर्लेखन
By Admin | Updated: September 19, 2015 00:47 IST2015-09-19T00:47:29+5:302015-09-19T00:47:29+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज सभा : वसुलीचा हक्क अबाधित ठेवून करणार कार्यवाही

108 कोटी रुपये थकीत कर्जाचे होणार निर्लेखन
जळगाव : वसुलीचा हक्क अबाधित ठेवण्याचे धोरण घेऊन जिल्हा बँक आपले वर्षानुवर्षे थकीत असलेले 108 कोटी 63 लाख 41 हजार रुपये कर्ज निर्लेखित करणार आहे. थकीत कर्जामुळे बँकेचा एनपीए वाढतो. याशिवाय संबंधित कर्जावरील व्याज, नुकसान याबाबतची माहिती ताळेबंदात द्यावी लागते. ही बाब लक्षात घेता बँकेच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सभेत नऊ विषयांवर होणार चर्चा जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 19 रोजी सकाळी 11 वाजता बँकेच्या रिंग रोडवरील मुख्यालयातील सभागृहात होत आहे. सभेत नऊ विषय निर्णयासाठी घेण्यात येतील. अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर प्रथमच बँकेच्या वार्षिक सभेला सामोरे जात आहेत. सर्वाधिक कर्ज बेलगंगा कारखान्यावर बँकेचे सर्वाधिक 71 कोटी 38 लाख 83 हजार 908 रुपये कर्ज भोरस ता.चाळीसगाव येथील बेलगंगा सहकारी साखर कारखान्यावर आहे. हा कारखाना अवसायनात गेला असून, त्याची विक्री किंवा तो पुन्हा सुरू करण्यासंबंधीचा कोणताही निर्णय अजून बँकेने घेतलेला नाही. याच वेळी या कारखान्यावरील कजर्ही निर्लेखित केले जाईल. 4खानापूर फ्रूटलेस सोसायटी- 35 लाख 30 हजार 495, 4जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती- 90 लाख, 4जे.टी.महाजन सूतगिरणी- 12 कोटी 96 लाख 76 हजार 133, 4मुक्ताई बिगरशेती सहकारी सोसायटी, मनुर बुद्रूक- 31 लाख 49 हजार 174, 4बेलगंगा साखर कारखाना- 71 कोटी 38 लाख 83 हजार 908, 4रावेर साखर कारखाना- 16 कोटी 79 लाख, 4जामनेर सहकारी साखर कारखाना- एक कोटी 59 लाख 45 हजार 978, 4जळगाव तालुका बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 36 लाख 19 हजार 80, 4यावल बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 16 लाख 84 हजार 903, 4रावेर बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 24 लाख 63 हजार 939, 4भुसावळ बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 33 लाख 31 हजार 629, 4मुक्ताईनगर बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 32 लाख 91 हजार 775, 4जामनेर बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 40 लाख 59 हजार 264, 4चाळीसगाव बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 27 लाख 79 हजार 476, 4पारोळा बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 32 लाख 77 हजार 100, 4भडगाव बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 18 लाख सहा हजार 224, 4चोपडा बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 32 लाख 87 हजार, 4पाचोरा चोपडा बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 30 लाख 44 हजार 441, 4एरंडोल चोपडा बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 50 लाख 56 हजार 370, 4अमळनेर चोपडा बलुतेदार कारागीर सहकारी संस्था- 43 लाख 61 हजार, 4लघु उद्योग व वाहन वैयक्तिक कजर्- 11 लाख 93 हजार 806.