100 गणरक्षक व पुण्याचे 600 ढोलवादक पथक

By Admin | Updated: September 25, 2015 00:29 IST2015-09-25T00:29:44+5:302015-09-25T00:29:44+5:30

जळगाव : गणेश विसजर्न मिरवणुकीसाठी पुण्याचे 600 ढोलवादक शहरात दाखल होतील तसेच बंदोबस्तासाठी पोलिसांसोबतच 100 गणरक्षक नेमण्यात आले आहे.

100 collectors and 600 drumming teams of Pune | 100 गणरक्षक व पुण्याचे 600 ढोलवादक पथक

100 गणरक्षक व पुण्याचे 600 ढोलवादक पथक

जळगाव : गणेश विसर्जन अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनासह सार्वजनिक गणेश महामंडळाने विसर्जनाची जोरदार तयारी सुरु केली आहे. मिरवणुकीला गालबोट लागू नये, शिस्तीत मिरवणूक निघावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या दिमतीला सार्वजनिक गणेश महामंडळातर्फे शंभर गणरक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांना स्वतंत्र असा पोशाख असणार आहे तसेच यंदा मिरवणुकीत पुणे येथील 600 ढोलवादक सहभागी होणार असून मिरवणुकीत रंग भरणार आहे.

बसेस्च्या मार्गात बदल

चोपडा, यावल, विदगावकडून जळगावकडे येणा:या जाणा:या सर्व एस.टी.बसेस् शिवाजी नगर पुलावरुन न जाता महामार्गावरुन आकाशवाणी चौक, गुजराल पेट्रोल पंप चौक, जुनी जैन फॅक्टरी, दूध फेडरेशन, गेंदालाल मील, शिवाजीनगरमार्गे येतील व जातील. तसेच आसोदा, भादलीकडून येणा:या व जाणा:या बसेस मोहन टॉकीज, गजानन मालुसरे नगर, जुने जळगाव, लक्ष्मी नगर व कालिंका माता मंदिराजवळून मुख्य महामार्गाने अजिंठा चौक, आकाशवाणीमार्गे बसस्थानकाला जातील व येतील.

जीव रक्षक नेमणार

मेहरुण तलावावर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस व मनपा प्रशासनाने तलावाच्या काठी बंदोबस्तासह बॅरिकेट्स लावले जाणार आहेत. तलावातून मोठय़ा प्रमाणात गाळ व मुरुम काढण्यात आल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे धोका अधिक आहे. हा धोका लक्षात घेता सार्वजनिक गणेश महामंडळाच्यावतीने जीव रक्षक नेमण्यात येणार आहेत. पट्टीचे पोहणा:यांनी सचिन नारळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिरवणूक मार्गावर रुग्णवाहिका व प्रथमोपचाराची सुविधा

मिरवणूक मार्गावर एखादा गणेशभक्त अथवा बंदोबस्तावरील कर्मचा:याला काही दुखापत झाली तर तत्काळ उपचार मिळावे यासाठी मिरवणूक संपर्पयत दोन रुग्णवाहिका, डॉक्टर व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद, शिवसेना व टेनिस असोसिएशनने यासाठी पुढाकार घेतला आहे.

अशी निघेल मिरवणूक

नेहरु पुतळ्यापासून सुरू झालेली मिरवणूक पारंपरिक पध्दतीने टॉवर चौक, घाणेकर चौक, बालाजी मंदिर, रथ चौक, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक, इच्छादेवी, शिरसोली नाका मार्गे मेहरुण तलावाजवळ पोहचेल. तलावाजवळ सप्तशृंगी मातेच्या मंदिराजवळून सर्व मंडळाच्या मूतींचे विसर्जन होईल. मिरवणुकी ढोल, ताशा, पारंपरिक नृत्य आदिवासी पथक, आखाडे व चित्तथरारक खेळाने मिरवणूक लक्षवेधी व उत्कृष्ट असणार आहे.

''कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल कटीबध्द आहे. उपद्रवी लोकांना हद्दपार केले आहे. शांतता भंग करणा:यावर कडक कारवाई केली जाईल. गुन्हेमुक्त गणेशोत्सवासाठी प्रय} आहेत.''

-डॉ.जालिंदर सुपेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक.

 

 

Web Title: 100 collectors and 600 drumming teams of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.