जळगाव जिल्ह्यातील १० तरुणांनी सर केले ‘संदकफू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 02:31 PM2021-01-02T14:31:29+5:302021-01-02T14:33:13+5:30

हिमालयातील पश्चिम बंगालमधील दार्जींलिंग जिल्ह्यात स्थित ‘संदकफू’ शिखरावर जळगाव जिल्ह्यातील १० साहसी तरुणांनी अवघ्या पाच दिवसांत चढाई केली.

10 youths from Jalgaon district do 'Sandakafu' | जळगाव जिल्ह्यातील १० तरुणांनी सर केले ‘संदकफू’

जळगाव जिल्ह्यातील १० तरुणांनी सर केले ‘संदकफू’

Next
ठळक मुद्देपाच दिवसात केली ५४ कि.मी.ची चढाईहिमालयातील अवघड शिखर केले पार
केत पाटीलखिर्डी, ता.ता.रावेर : भारतातील अत्यंत कठीण मानल्या गेलेल्या हिमालयातील पश्चिम बंगालमधील दार्जींलिंग जिल्ह्यात स्थित ‘संदकफू’ शिखरावर जळगाव जिल्ह्यातील १० साहसी तरुणांनी अवघ्या पाच दिवसांत चढाई केली. याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. पश्चिम बंगालमधील दार्जींलिंग जिल्ह्यात असलेले संदकफू हे शिखर सिंगलिला रेंजमधील १२ हजार फूट उंचीवर असलेले सर्वांत उंच शिखर असून नेपाळ सीमेच्या अगदी जवळ आहे. संदकफू शिखर गाठून जगातील पाच सर्वोच्च शिखरांपैकी माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा, लाहोत्से व मकालू अशी चार शिखरे येथून दिसतात. युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने डिसेंबर- जानेवारी महिन्यात गिर्यारोहकांसाठी संदकफू शिखर सर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात जिल्ह्यातील १० तरुणांनी सहभाग नोंदविला होता. अवघ्या पाच दिवसांत त्यांनी ५४ किलोमीटर चढाई करीत हे शिखर गाठले.ताशी ७० ते ८० कि.मी. वेगाने वाहणारे थंड वारे, तापमान कमाल एक ते किमान उणे आठ अंश, सभोवताली हाडे गोठवणारी थंडी, प्राणवायूची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे शिखर सर केले. याची सुरुवात पश्चिम बंगालमधील दार्जींलिंग येथील बेस कॅम्पवरुन झाली. ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी दार्जींलिंग हा ६,७०० फुटांवरचा बेस कॅम्प, पुढे धोत्रे (८,५०० फुट), तुंबलिंग (१०,०००फुट), कालापोखरी (१०,१९६फुट), संदकफू (१२,०००फुट), श्रीखोला (७,४९८फुट) असे कॅम्प होते. कालापोखरी ते श्रीखोला दरम्यान दरम्यान संदकफू हे बारा हजार फुटांवरील सिंगलीला रेंजमधील सर्वांत उंच शिखर आहे. चढाईसाठी अत्यंत अवघड व धोकादायक मानले जाते. या शिखराचा रस्ता मणिबंजन पासुन सुरु होतो. सुमारे ५४ किमी लांबीचा रस्ता खूपच सुंदर आहे. येथील हिमालयातील कोब्रा लिलींच्या विपुलतेमुळे संदकफूला ‘विषारी वनस्पतींचा पर्वत’ म्हणून ओळखले जाते. हा एक कठीण ट्रॅक असल्याने गिर्यारोहकांना येथे जाण्यापूर्वी शरीराच्या तंदुरुस्तीची खूप काळजी घेतली जाते. असे अत्यंत कठीण शिखर सर केल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.या गिर्यारोहकांचा सहभागरोमिंग राजपूत (भुसावळ), अनिल महाजन (वरणगाव फॅक्टरी), डॉ.राहुल भोईटे (वरणगाव), डॉ. रवींद्र माळी (वरणगाव), दिनेश पाटील (खिर्डी बुद्रूक), श्रीकांत माळी (वरणगाव), प्रशांत पाटील (तांदलवाडी), अजय चाळसे (वरणगाव), प्रदीप वराडे (जळगाव), समाधान महाजन (विखरण) भारत आणि नेपाळच्या सीमेवरील हिमालयाच्या पर्वत रांगांत गिर्यारोहण करण्याचा अनुभव फार वेगळा आणि विशेष आहे. "The best view comes after the hardest climb" या उक्तीचा प्रत्यय संदकफू ट्रॅकदरम्यान वारंवार येतो.-रोमिंग राजपूत, गिर्यारोहक, भुसावळ

Web Title: 10 youths from Jalgaon district do 'Sandakafu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.