लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे ६६ हजार तर कोव्हॅक्सिनचे ३२०० डोस प्राप्त झाले असून यातून जळगाव शहर महापालिकेच्या केंद्रांना १० हजार कोविशिल्डचे डोस देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस लसीकरण सुरळीत सुरू राहणार आहे. रोटरी व रेडक्रॉस या दोन केंद्रांना १७०० डोस देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम काहीशी मंदावली हाती. मात्र, आता पुन्हा डासे प्राप्त झाल्याने या मोहीमेला गती येणार आहे. मिळालेले डोस अधिकाधिक सत्र घेऊन एकाच दिवसात संपविण्याचे आदेश आरोग्य विभागाचे असून त्या दृष्टीने या लसींचे वाटप होत आहे. जळगाव शहराला कोव्हॅक्सिनचे ३०० डोस मिळालेले आहे. कोविशिल्डच्या तुलने कोव्हॅक्सिनचे कमी डोस येत असल्याने अनेकांच्या दुसऱ्या डोसचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
जिल्ह्यात ६ हजार लसीकरण
जिल्ह्यात मंगळवारी २३ सत्र सुरू होते. त्यात ६ हजार ८०२ जणांचे लसीकरण झाले. १७ लाखांवर लसीकरण पोहोचले असून २८ जनतेचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रशासनाचे उदिष्ट आहेत. त्यात आता पहिल्या व दुसऱ्या डोसमधील अंतर काहीशे कमी झाले आहे. मध्यंतरी हे अंतर वाढलेले होते.