बस व ट्रकच्या अपघातात 10 प्रवासी जखमी

By Admin | Updated: July 3, 2017 14:52 IST2017-07-03T14:52:12+5:302017-07-03T14:52:12+5:30

भडगाव-पाचोरा रस्त्यावर झाली दुर्घटना

10 passengers injured in bus and truck collision | बस व ट्रकच्या अपघातात 10 प्रवासी जखमी

बस व ट्रकच्या अपघातात 10 प्रवासी जखमी

 ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, दि.3 -भडगाव -पाचोरा रस्त्यावरील वडगाव फाटय़ावर सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बस व ट्रकचा अपघात होऊन त्यात 10 प्रवासी जखमी झाले.
चाळीसगाव आगाराची एमएच 20 बीएल 2410 या क्रमांकाची एस.टी.बस पाचो:याकडून चाळीसगावकडे जात होती. तर एमएच 20 डीई 6087 या क्रमांकाची ट्रक भडगावकडून पाचो:याकडे येत होती. दोन्ही वाहने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वडगाव फाटय़ावर आल्यानंतर एकमेकांवर आदळली. या अपघातात एस.टी.चा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर बस मधील 9 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्याने जाणा:या वाहनधारकांनी जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: 10 passengers injured in bus and truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.