७११ फेरीवाल्यांना १० लाखांचे अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:24+5:302021-06-01T04:12:24+5:30
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत राज्यातील ...

७११ फेरीवाल्यांना १० लाखांचे अर्थसहाय्य
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत राज्यातील फेरीवाले व पथविक्रेते यांच्या व्यवसायावर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे फेरीवाले व पथविक्रेते या दुर्बल घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने सदर बाब लक्षात घेता मुख्यमंत्री यांनी १३ एप्रिल रोजी दुर्बल घटकांसाठी पॅकेज जाहीर केलेले आहे. सदर लाभाचे पॅकेज १५ एप्रिलपर्यंत प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेमध्ये अर्ज केलेल्या पथविक्रेत्यांना लागू करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेत ७११ लाभार्थ्यांना १५००प्रमाणे १०लाख ६६ हजार ५०० चे आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.यामुळे अमळनेर शहरातील सर्व फेरीवाले व पथविक्रेत्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सदर लाभासाठी प्रयत्न करणारे माजी आमदार साहेबराव पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता
पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड आदींचे लाभार्थ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.