जळगाव येथे सिलिंडरचा स्फोट होऊन 10 घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 13:15 IST2018-02-01T13:14:45+5:302018-02-01T13:15:56+5:30
सुदैवाने जिवीत हानी नाही

जळगाव येथे सिलिंडरचा स्फोट होऊन 10 घरे जळून खाक
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - शहरातील तुकाराम वाडी भागातील रहिवासी शंकर विठ्ठल माळी यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन माळी यांच्या घरासह आजूबाजूचे जवळपास 10 घरे जळून खाक झाले. सुदैवाने यात जिवीत हानी नाही. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. आगीचे कारण समजू शकले नाही.
शंकर माळी व त्यांचे कुटुंबीय हे स्वामी समर्थ पालखी सोहळ्य़ात गेलेले होते. त्या वेळी घर बंद असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यात माळी यांच्या घरात सर्वत्र आगीचे लोळ पसरले. काही क्षणातच ही आग आजूबाजला पसरून जवळपास 10 घर जळून खाक झाली. या वेळी या सर्व घरांना कुलूप होते. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही.
आगीनंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत पाण्याचा मारा करून आग विझविली. या परिसरात लहान लहान बोळी असल्याचे अग्नीशमन दलाचे बंब लवकर पोहचू शकले व मदतीस अडथळे आले.