महिलेच्या बॅगमधून ५० हजार लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 22:30 IST2019-08-23T22:30:39+5:302019-08-23T22:30:47+5:30
पारोळा : येथील बसस्थानकावर चोरट्याने महिलेची बॅग कापून त्यातून ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना २१ रोजी दुपारी ४.४५ ...

महिलेच्या बॅगमधून ५० हजार लांबविले
पारोळा : येथील बसस्थानकावर चोरट्याने महिलेची बॅग कापून त्यातून ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना २१ रोजी दुपारी ४.४५ वाजता घडली.
शीतल राजेंद्र मोरणकार (रा. पाचोरा) या पाचोरा येथे जाण्यासाठी निघाल्या असता नंदुरबार-पाचोरा बस स्थानकावर आली. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग ब्लेडने कापून ५० हजार रुपये लंपास केले. बसमध्ये बसल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली. चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी सदर महिला पारोळा पोलीस ठाण्यात गली असता पोलीस निरीक्षक आल्यावर त्यांना विचारून मग तक्रार घेऊ, ठाणे अंमलदाराने सांगितले. त्यामुळे केवळ तक्रार अर्ज करावा लागला.
दुहेरी संकट
शीतल यांचे सासरे आजारी असल्याने उपचारासाठी भावाकडून हे ५० हजार रुपये घेतले होते, असे शीतल यांनी सांगितले. मात्र, सास-याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच वेळी असे दुहेरी संकट ओढवले.