जिल्ह्यात रोहयोची १ हजार ६७३ कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST2021-07-30T04:17:41+5:302021-07-30T04:17:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची एकूण १ हजार ६७३ कामे सुरू आहेत. या कामांवर दिवसाला ...

1 thousand 673 works of Rohyo started in the district | जिल्ह्यात रोहयोची १ हजार ६७३ कामे सुरू

जिल्ह्यात रोहयोची १ हजार ६७३ कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची एकूण १ हजार ६७३ कामे सुरू आहेत. या कामांवर दिवसाला ८ हजार ९२ मजूर काम करत आहेत, तर त्यातील २८५ कामे ही शासकीय यंत्रणेच्या स्तरावर आहेत, तर १ हजार ३८८ कामे ही ग्रामपंचायत स्तरावर सुरू आहेत, तर नाशिक विभागात सध्या ७ हजार ८३० कामे सुरू आहेत. त्यातून विभागात ३६ हजार १२६ जणांना रोजगार मिळाला आहे.

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला होता. त्यासोबतच बहुतेक जण मुंबई-पुण्याहून बरेच कामगार आपल्या मुळगावीदेखील परतले होते. त्यांनाही जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी काही दिवसांमध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून रोजगार हमीच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. सध्या जिल्ह्यात १ हजार ३८८ कामे ही ग्रामपंचायत स्तरावर सुरू आहेत. त्या ठिकाणी ६ हजार ४५३ जणांना काम मिळाले आहे.

धुळे जिल्ह्यात ५८४ कामे सुरू असून, दोन हजार ६६२ मजुरांना काम मिळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातही १ हजार ८६६ कामांवर ८ हजार १६ मजूर कामावर आहेत. खान्देशात सर्वांत जास्त रोहयोतून काम हे जळगाव आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.

Web Title: 1 thousand 673 works of Rohyo started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.