शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

युवक-युवतींनी समाज, कुटुंबाप्रती संवेदनशील राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:07 IST

समाज, कुटुंबाप्रती युवकांनी संवेदनशील रहावे, असा सूर शहरात आयोजित अग्र- महाकुंभमधील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांमधून निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजच्या युवकांकडे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. परंतु, कम्युनिकेशन (आपापसातील संवाद) हरपत चालला आहे. ‘आपण आणि आपले बरे’, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे कुठे तरी थांबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. तसेच समाज, कुटुंबाप्रती युवकांनी संवेदनशील रहावे, असा सूर शहरात आयोजित अग्र- महाकुंभमधील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांमधून निघाला.दानकँुवर महाविद्यालयातील प्रांगणात अग्रवाल समाजाचे २४ वे प्रांतीय संमेलन अर्थात अग्र- महाकुंभ आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ज्येष्ठ पदाधिकारी विजय चौधरी, महामंत्री गोपाल अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्त आयोजित ‘युवा चेतना’ या चर्चासत्रात छत्तीसगड येथील प्रसिध्द वक्ते हरीश मंत्री आणि पुणे येथील द्वारकाप्रसाद जालान यांनी विचार मांडले. युवकांनी समाजाप्रती संवेदना ठेवली पाहिजे. समाजाचे आणि कुटुंबाचे आपण घटक असल्याने त्यांचा विचार होणे गरजेचे आहे. आज माणसाकडे स्वत:साठी वेळ आहे. परंतु, समाजासाठी वेळ खर्ची करण्यास आजचा युवक धजावत नाही.एकूणच आज संपर्काची अनेक साधने उपलब्ध असली तरी आपल्या मनात दडलेले दु:ख हे कोणाजवळ व्यक्त करावे, अशी विश्वासू व्यक्ती सापडत नाही. त्यामुळे वडील, मुलगा, नोकर हे देखील एक चांगले मित्र होऊ शकतात. ज्यांच्या जवळ तुम्ही तुमच्या भाव-भावना आणि दु:ख व्यक्त करू शकता. आयुष्यात काही मिळविण्याच्या नादात जगणं विसरत चाललो आहोत. याचे भान कुणालाही नाही. त्यामुळेच जे जीवन मिळाले आहे ते जास्तीत जास्त आनंदाने कसे जगता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावेयावेळी मंत्री यांनी सांगितले की, आपल्याजवळ जे काही आहे, त्या पलीकडेही मोठे जग आहे. त्याकडे लक्ष वेधताना आयुष्याकडे बघताना सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, त्यासाठी दृष्टीकोन बदलणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार तथा अग्रवाल प्रांतीय समाजाचे अध्यक्ष किरण अग्रवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष देविदान, उद्योजक घनशाम गोयल, दिनेश भारूका, सरिता बगडिया, पुरूषोत्तम जयपुरिया, संजय अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, डॉ. अनिता तवरावाला, संदीप गिंदोडिया, मनिष तवरावाला हे प्रयत्न करत आहेत.संमेलनात आज अनेक ठरावजालना येथे २४ वे अग्रवाल संमेलन भरविण्यामागचा उद्देश सकारात्मक दृष्टीकोन वाढविणे आणि ज्या काही समाजामध्ये अनिष्ट प्रथा, रूढी आहेत, त्यांना तिलांजली देऊन नवीन समाज निर्मिती करण्यासाठी रविवारी या संमेलनात विविध ठराव संमत करण्यात येणार आहेत.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकFamilyपरिवार