शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जालन्यातून पिस्तूलाच्या धाकावर अपहरण झालेल्या युवकाचा खून; मृतदेह फेकला बुलढाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:45 IST

बुलढाणा जिल्ह्यातील तडेगाव-टाकरखेडा रोडवरील एका शेतात मृतदेह आढळून आला.

कुंभार पिंपळगाव (जि. जालना) : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील सुरेश तुकाराम आर्दड (वय ३३, रा. राजा टाकळी) यांचा जुन्या वादातून गावठी पिस्तूल व कुऱ्हाडीच्या धाकावर अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. खून केल्यानंतर सुरेश आर्दड यांचा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यात नेऊन फेकला. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यांतील पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास, कुंभार पिंपळगाव बाजार समितीसमोरून सुरेश आर्दड (वय ३३, रा. राजा टाकळी) यांचे चार जणांनी अपहरण केले होते. गावठी पिस्तूल व कुऱ्हाडीच्या धाकावर सुरेश यांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून अज्ञात दिशेने नेण्यात आले. रविवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील तडेगाव-टाकरखेडा रोडवरील एका शेतात सुरेश यांचा मृतदेह आढळून आला.

चार आरोपींवर गुन्हा दाखलयाप्रकरणी फिर्यादी सुभाष लळितराव आर्दड (सुरेश यांचे चुलत भाऊ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हरी कल्याण तौर, सखाराम ऊर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (दोघेही रा. राजा टाकळी), मिनाज बाबामिया सय्यद (रा. कुंभार पिंपळगाव) आणि एक अज्ञात चालक, या आरोपींविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश आर्दड याचा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. याबाबत किनगावराजा पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून उत्तरीय तपासणी केली. यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी