शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

तरूणाई गुन्हेगारीच्या विळख्यात; कारागृहात ५० टक्के तरूण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:30 IST

कारागृहात समुपदेशनातून मनपरिवर्तनाचा प्रयत्न 

ठळक मुद्दे काहींवर विविध गुन्ह्यात प्रथम कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. कारागृहात असलेल्या आरोपींपैकी काही आरोपी हे सराईत आहेत.

जालना : वाढलेली बेरोजगारी, अशिक्षितपणा, श्रम न करण्याची सवय, सराईत गुन्हेगारी आदी एक ना अनेक कारणांमुळे आजची युवा पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. कारागृहात दाखल २७१ पैकी १५३ युवक हे १८ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. एकूण कैद्यांच्या तुलनेत युवक आरोपी असण्याचे प्रमाण हे ५० टक्क्यांहूनही अधिक दिसून येत आहे. 

उद्योगनगरी असलेल्या जालना शहरासह जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात गत काही वर्षात चोऱ्या, दरोडे, पिस्तूलची अवैध विक्री, अवैध दारूविक्री आदी विविध गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात कोरोनामुळे कंपन्या बंद पडल्या आणि अनेकांच्या हातचे काम गेले. त्यामुळे सराईत गुन्हेगारांप्रमाणेच नवखे गुन्हेगारही विविध गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागू लागले आहेत. गत काही वर्षात पिस्तूल विक्रीचाही पर्दाफाश झाला होता. त्यात पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये युवकांची संख्या अधिक होती. भोकरदन पोलीस व चंदनझिरा पोलिसांनी नुकताच दुचाकी चोरीतील आरोपींना जेरबंद केले आहे. यामध्येही युवकांचेच प्रमाण अधिक दिसून येत आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली जाणाऱ्या आरोपींना जिल्हा कारागृहात दाखल केले जाते. घरफोड्यांसह इतर चोऱ्यांचे प्रमाणही वाढत असून, यात युवा आरोपींची संख्या अधिक दिसून येत आहे. कारागृहात असलेल्या आरोपींपैकी काही आरोपी हे सराईत आहेत. तर काहींवर विविध गुन्ह्यात प्रथम कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. 

जालना येथील जिल्हा कारागृहात एकूण २७१ कैदी आहेत. त्यात पाच शिक्षाबंदी असून, इतर सर्व कच्चे कैदी आहेत. कारागृहात येणाऱ्या कच्च्या कैद्यांची प्रारंभी कोरोना तपासणी करून त्यांना कारागृहात घेतले जात आहे. कारागृहात येणाऱ्या कैद्यांसाठी वाचनालयाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. शिवाय कॅन्टीनमधील पदार्थ हे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी मनिऑर्डरने कैद्यांच्या नावे रक्कम मागवून त्यातील पैसे खर्च केले जातात. महिन्याकाठी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे साडेचार हजार रूपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. या कारागृहात येणाऱ्या कैद्यांचे समुपदेशन करण्यावर अधीक्षक अनिता गुगुटराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष भर दिला आहे.  अनेकवेळा बाहेरील तज्ज्ञांना बोलावूनही विविध विषयावर माहिती दिली जाते. कैद्यांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून लहान-सहान व्यावसाय करून जीवन जगावे याबाबतही समुपदेशन केले जाते. शिवाय वेळोवेळी आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे.

बलात्कारातील गुन्ह्याचे प्रमाण जास्तमहिला अत्याचाराच्या प्रकरणातही अनेक आरोपी या कारागृहात आहेत. विनयभंग, अत्याचाराच्या प्रकरणात येणाऱ्या युवकांचे प्रमाणही गत काही वर्षात वाढले आहे. दाखल तक्रारींचे प्रमाण गत काही वर्षात सरासरी सारखेच असल्याचे सांगण्यात येते.

महिला कैद्यांच्या संख्येत वाढ कारागृहात येणाऱ्या महिला आरोपींची संख्या तीन वर्षांपूर्वी कमी होती. मात्र, गत तीन वर्षापासून महिला आरोपींच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या या कारागृहात २० महिला आरोपी असून, त्यातील १३ जणी गंभीर गुन्ह्यात आहेत.

पैशांसाठी काहीही करण्यास तयार...पैसे मिळावे म्हणून शहर व परिसरातील अनेक युवक दुचाकींची चोरी करीत आहेत. अटक आरोपींमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. अनेक युवक घरफोडी, दुकानफोडीतही सक्रिय झाले आहेत. घरफोडीत पकडण्यात आलेल्या आरोपींमध्येही युवकांचीच संख्या अधिक आहे. महिलांना विशेषत: वृद्ध महिलांना टार्गेट करून दागिने, पैसे लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक युवक विना नंबरची दुचाकी वापरून महिलांचे दागिने लुटतात .

पॅरोलवरील दोन कैदी बाहेरकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडण्यात येत होते. त्यानुसार सध्या कारागृहातील दोन कैद्यांना पॅरोलवर ४५ दिवसांसाठी सोडण्यात आले आहे. पॅरोलवर कैद्याला बाहेर सोडताना विविध अटी घालून त्याला सोडले जात असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाjailतुरुंग