शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

युवकाने पथसंचलनात वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:06 IST

जालन्यापासून जवळच असलेल्या मांडवा येथील युवक गजानन बबनराव मिसाळ यांनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्य दलातील डीएआरई -सिग्नल कोर या तुकडीतून उत्कृष्ट मोटासायकल संचलनात दुसऱ्यांदा सहभाग नोंदविला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यापासून जवळच असलेल्या मांडवा येथील युवक गजानन बबनराव मिसाळ यांनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्य दलातील डीएआरई -सिग्नल कोर या तुकडीतून उत्कृष्ट मोटासायकल संचलनात दुसऱ्यांदा सहभाग नोंदविला आहे. जालन्याच्या युवकाला ही नेतृत्वाची संधी मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात आपल्याला जाता यावे ही गजाजन मिसाळची पूर्वीपासूसनची इच्छा होती. ती प्रत्यक्षात उतरल्याचा मोठा आनंद असल्याचे गजानन मिसाळ यांनी सांगितले. यापूर्वी देखील अशी संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात मिसाळ व त्यांचे एकूण ३८ सहकारी जवान सहभागी झाले होते. मोटासायकलवरून ही सलामी राष्ट्रपतींना द्यावी लागते. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. त्यावेळी क्षुल्लक चूकही आपल्या देशाची मान खाली घालवते. त्यामुळे या मोटासायकलवरून सलामी देण्याच्या पथकात सहभागी होताना अत्यंत कसून तयारी करून घेतली जाते.या तयारीत आपण सलग दुस-यांना यशस्वी झाल्याने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. उत्कृष्ट सलामीबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला. महाराष्ट्रातून एकूण आठ जणांचा समावेश होता होता, तर मराठवाड्यातून गजानन मिसाळ हे एकमेव जवान होते. गजानन यांचे प्राथमिक शिक्षण मांडवा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण हे मस्य्योदरी महाविद्यालयात झाले आहे.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनSocialसामाजिक