शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

"आमच्या अन्नात माती कालवणारा..."; लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगेवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 14:52 IST

शासन किंवा जरांगे यापैकी कोण खरं बोलतय, या बाबतीत संभ्रम अन् नैराशाची भावना : लक्ष्मण हाके

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना): मनोज जरांगे म्हणत आहेत, आम्ही शंभर टक्के ओबीसी आरक्षणात घुसलोय आणि दुसरीकडे शासन म्हणते की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही,' महान ' नेते खरं बोलत आहेत की शासन खरं बोलतेय? भुजबळ यांना टार्गेट करायचे आणि आम्हाला भाऊ म्हणायचं ? आमच्या अन्नात माती कालवणारा तू आणि आम्हाला भाऊ म्हणतो ? अशी जहरी टीका ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी केली. तसेच ओबीसीने एखादी दंगल केलेली ऐकली आहे का? ओबीसीने एखाद्या नेत्याला टार्गेट केलेला ऐकले का? कायदा हातात घेऊ नका, गुन्हे दाखल करून घ्यायचे नाहीत, असे आवाहन देखील हाके यांनी ओबीसी बांधवांना आज केले.

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवत असताना सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत आज सायंकाळी ६. १५ ते ७ वाजेपर्यंत  आंदोलकांनी धुळे- सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे रास्तारोको केला. आक्रमक आंदोलकांनी महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावर हाके यांनी आपल्याला कायदा हातात घेयाचा नाही, असे आवाहन ओबीसी बांधवांना केले. त्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. आज पाणी पिल आहे आपण कायदा हातात घेऊ नका एवढीच माझी विनंती आहे, असे हाके ओबीसी बांधवांना सांगितले.

एकाला रेड कार्पेट तर दुसऱ्याकडे दुर्लक्षशासनाला माझी विनंती आहे, आमच्या पोराला  कळतंय. आता ते तुलना करतात कम्पॅरिझन करत आहेत. एका आंदोलनाला रेड कार्पेट घातलं जातं आणि दुसऱ्या आंदोलनाला ढुंकूनही बघितलं जात नाही. तिकडे रेड कार्पेट घातले जाते आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ही आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. शासन बोगस सर्टिफिकेट वाटत आहे, शासन ओबीसींच नसेल तर आम्हाला जनतेच्या दरबारात जावे लागेल. रास्ता रोको करायचा असता तर आपण उपोषणाला बसलोच नसतो. सबसे बडा कायदा, सबसे बडा संविधान है. जरांगे म्हणतात की, आम्ही 80 टक्के मराठी ओबीसी मध्ये घुसलो आहे, शासन किंवा जरांगे यापैकी कोण खरं बोलतय, या बाबतीत संभ्रम आहे नैराशांची भावना आहे. ओबीसी आरक्षणा धक्का कसा लागत नाही हे सरकारने आम्हाला सांगावं, असे आव्हान हाके यांनी राज्य सरकारला दिले. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालनाlaxman hakeलक्ष्मण हाके