शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले योगाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 01:11 IST

फिट इंडिया मोहिमेंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिट इंडिया मोहिमेंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी एक हजार पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.यावेळी पंतप्रधान मोदी यांनी क्रीडा दिनाचे औचित्य साधून फिट इंडियाचा संकल्प केला आहे. तो स्तुत्य असून, सर्वांनी व्यायाम व आरोग्याकडे लक्ष दिल्यास मोदींच्या स्वप्नातील फिट इंडिया प्रत्यक्षात उतरेल असे, डॉ. कैलास सचदेव यांनी सांगितले.येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात फिट इंडिया अंतर्गत योग शिक्षक डॉ. सचदेव यांच्या विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले हाते. पुढे बोलतांना सचदेव यांनी सांगितले की, व्यायाम म्हणजे जोर बैठका काढणे नव्हे, व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. या योग साधनेतील आसनांमुळे विविध प्रकारच्या गंभीर व्याधी दूर होतात. प्राणायाम केल्याने तुमचे स्वास्थ्य आणि मनदेखील प्रफुल्लित राहाते. आपण तर पोलीस दलात राहणार आहात, त्यामुळे पोलिसांनी तर आरोग्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यांना भविष्यात आरोग्यासोबतच जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारीही सांभाळावी लागते. त्यासाठी पोलिसांचे आरोग्य हे उत्तम राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मोदींच्या पुढाकारानेच २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगाने मान्य केल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एन.डी. चव्हाण यांनी उद्घाटन केले. यावेळी अ‍ॅड. महेश धन्नवात, प्राचार्य चव्हाण यांनी देखील डॉ. केलास सचदेव यांच्या बद्दल आपण ऐकून होतो, ते विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून आरोग्यासाठीची मोठी जनजागृती करत असून, ते विविध मॅरथॉनचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्याबद्दल आम्हाला अभिमान असल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी अ‍ॅड. धन्नावत यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :YogaयोगJalna Policeजालना पोलीसHealthआरोग्य