शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

यंदा केवळ ५८ गावांनाच बसणार टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 01:08 IST

परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी टंचाईची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संपूर्ण पावसाळा संपल्यावरही पावसाने जिल्ह्याची सरासरी गाठली नव्हती. परंतु परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी टंचाईची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे. या अवकाळी पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. असे असले तरी यंदा पाणी टंचाई पूर्वीप्रमाणे तीव्र होणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.गेल्या वर्षी पाणी टंचाईने हैराण असलेल्या जालनेकरांना यंदा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी टँकरची संख्या ही ५०० पेक्षा अधिक झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासन त्रस्त झाले होते. कोट्यवधी रूपये टँकरचे बिल देण्यावर शासनाचा खर्च झाला आहे. ही टंचाई जाणवू नये म्हणून गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना आणली होती. परंतु या योजनेचाही पाहिजे तेवढा परिणाम झाला नाही. ही कामे करताना अनेकवेळा निकष बदलले गेल्याने देखील कामांमध्ये दर्जा राहिला नसल्याचे चित्र आहे.जालना जिल्हा हा पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे पक्के स्त्रोत येथे नसल्याने दिवाळी नंतरच पाणी टंचाईच्या झळा येथे सुरू होतात. यंदा दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाचा मोठा दिलासा टंचाई निवारण्यासाठी मिळाल्याने प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.जालना येथील भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हयातील पाणी टंचाईचा आढावा हा जिल्ह्यातील ११० विहिरींमधील पाणी पातळीचा अभ्यास करून घेतला. त्यात यंदा जवळपास सर्वच विहिरींची पाणीपातळी एक मीटरने वाढली आहे.अपवाद केवळ जालना, बदनापूर तसेच मंठा तालुक्यातील काही विहिरींचा देता येईल. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ ही खऱ्या अर्थाने मार्च ते जून या कालावधीत जाणवू शकते आणि ती देखील केवळ ५८ गावांमध्ये ही टंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते, असा अहवाल जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातRainपाऊसWaterपाणी