शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राँग साईड बैलगाडी ठरली काळ; परीक्षेसाठी दुचाकीवर जाणारा अभियांत्रिकी विद्यार्थी धडकेत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:12 IST

अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; धुळे ते सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री डाव्या कालव्याजवळील घटना

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : पाटोद्याहून छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेसाठी जाणाऱ्या अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याचा विरुद्ध दिशेने येणाऱ्या उसाच्या बैलगाडीस दुचाकी धडकल्याने मृत्यू झाला. चैतन्य वैद्यनाथ जायभाये ( २०,  काकडहिरा ता. पाटोदा जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात धुळे ते सोलापूर महामार्गावर आज सकाळी ( दि. ३ ) ७ वाजेच्या दरम्यान वडीगोद्री डाव्या कालव्या जवळ झाला.

पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील चैतन्य वैद्यनाथ जायभाये हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याची छत्रपती संभाजीनगर येथे आज सकाळी साडे अकरा वाजता परीक्षा होती. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी चैतन्य आज पहाटे साडेपाच वाजता काकडहिरा येथील घरून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर ( क्रमांक एम.एच.२३ बी.डी.५०८८) निघाला. सकाळी वडीगोद्री डाव्या कालव्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीसोबत दुचाकीची जोरदार धडक झाली. यात चैतन्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

दुचाकीचा चुराडा झालाउसाची बैलगाडी आणि दुचाकीची जोरदार अपघात झाल्यानंतर चैतन्य गंभीर जखमी झाला. तर दुचाकी चकानाचूर झाली. चुकीच्या दिशेने आलेल्या ऊस टायरगाडीमुळे अपघात होऊन चैतन्यचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी वार्ता समजताच जायभाये कुटुंब व काकडहिरा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना