शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आगीत नऊ लाखांचे फर्निचर खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:39 IST

विकासनगर भागात राहणाऱ्या डॉ.ओमप्रकाश गोधा यांच्या घराला बुधवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : शहरातील विकासनगर भागात राहणाऱ्या डॉ.ओमप्रकाश गोधा यांच्या घराला बुधवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे.डॉ. गोधा यांचे घर व दवाखाना एकाच ठिकाणी आहे. बुधवारी रात्री ते परिवारासह झोपले असता त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीला अचानक आग लागली. आग लागल्याचे परिसरातील रहिवाशांना दिसले. त्यामुळे त्यांनी तात्काळ डॉ. गोधा यांच्या परिवाराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाकडी फर्निचरमुळे आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. डॉ. गोधा यांचा परिवार खालच्या खोलीत असल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, लागलेल्या आगीत खरेदी केलेले सर्व नवीन फर्निचर जळून खाक झाले असून, जवळपास नऊ लाखांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. आग विझविण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर अडीच तासांनी आग आटोक्यात आली.गोधा यांनी घराच्या दुस-या मजल्याचे बांधकाम पूर्ण केले होते. त्याची ६ एप्रिल रोजी वास्तुशांती होती. त्यामुळे गोधा यांनी मुंबई येथून फर्निचर मागवले होते. मात्र रात्रीच्या आगीत ते पूर्ण जळून खाक झाले आहे.

टॅग्स :fireआगHomeघर