शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

टँकरसाठी तहसीलदारांच्या दालनात महिलांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:12 IST

टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी परतूर तालुक्यातील मसला येथील संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी परतूर तालुक्यातील मसला येथील संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.परतूर तालुक्यातील बहुतांश गावांत सध्या पाणी टंचाई आहे. गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा यासाठी अनेक गावांनी तहसील प्रशासनाकडे प्रस्ताव दिले आहेत. मसला ग्रा.पं. यात समावेश आहे. गावातील शासकीय विहिरी, बोअर आटले आहेत. यामुळे पाण्यासाठी महिलांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. विहिरीवरून आणलेले पाणी गाळयुक्त आणि दूषित असल्याने गावकरी पोटदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊनही प्रशासनाकडून पाणी टंचाई निवारण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने संतप्त महिलांनी थेट तहसील कार्यालय गाठून नायब तहसीलदार सुरेखा कुटूरकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी बाटलीत सोबत आणलेले दूषित पाणी तहसीलदारांच्या टेबलावर ठेवले. तुम्ही बाटलीबंद पाणी पिता, आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. दोन दिवसांत गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी शांताबाई पाईकराव, सिंधू गिराम, अनूसया राक्षे, मुगाबाई निलेवाड, शारदा गुंजमूर्ती, छबाबाई भदर्गे आदींची उपस्थिती होती.गैरसोय दूर करणारटंचाईग्रस्त गावात टँकरव्दारे पाणी पुरवठ्यावर प्रशासन सकरात्मक आहे. मसला गावासाठी तातडीने टँकर सुरु करण्यात येणार असल्याचे सुरेखा कुटूरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Womenमहिलाagitationआंदोलनwater shortageपाणीटंचाई