शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:27 IST

मुस्लिमबहुल भागातील नागरिकांसह मोठ्या संख्येने महिलांनी नगरपालिकेत पाण्याची मागणी करत घोषणाबाजी करून ठिय्या मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : रमजान महिन्यात मुस्लिमबहुल भागासह इतर काही भागात पाणीपुरवठा करण्यात न. प. अपयशी ठरल्याने मंगळवारी रोजी शहरातील मुस्लिमबहुल भागातील नागरिकांसह मोठ्या संख्येने महिलांनी नगरपालिकेत पाण्याची मागणी करत घोषणाबाजी करून ठिय्या मांडला.यावेळी नागरिकांनी निवेदन आणले होते, पण नगर परिषद मध्ये हा मोर्चा आला तेव्हा नगर परिषदेच्या कार्यालयात अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे नागरिकांचा आक्रोश वाढत गेला. नागरिकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना येथे बोलवण्याचा हट्ट धरला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगरसेवक शेख कदीर, नगरसेवक हामदू चाउस यांनी पालिकेत येऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनीही जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रकरण वाढत चालल्याचे लक्षात येताच पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला होता. पाणीवाटपामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी यावेळी केला. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना नागरिकांनी निवेदन दिले.भोकरदन शहराला खडकपूर्णा धरणातून टँकर ने पाणीपुरवठा करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी २२ मे रोजी प्रत्यक्ष भेट देऊन जाफराबाद जवळील पॉईंटचे काम आठ दिवसात पूर्ण करून शहराला पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देऊनही अद्याप काम पूर्ण झाले नाही. तो पॉइंट सुरू झाला असता, तर पाणी टंचाईचे निवारण्यात मोठी मदत झाली असती. आताही हा पॉइंट सुरू झाला तरच शहराला काही प्रमाणात पाणी मिळणार आहे. शहरात पाणी सोडताना भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप या वेळी नागरिकांनी केला. एकूणच या संतप्त नागरिकांनी मोठा रोष व्यक्त केला.

टॅग्स :Womenमहिलाagitationआंदोलनwater shortageपाणीटंचाई