शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजनात महिलाच पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 00:10 IST

जिल्ह्यातील आकडेवारीवरून महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पुरुष महिला दोघांनाही करता येते, पण जिल्ह्यातील आकडेवारीवरून महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे. यंदा पुरुषांनी उद्दिष्टाच्या तुलनेत अवघ्या ११ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.वाढत्या महागाईत अपत्य एक किंवा दोन यापेक्षा जास्त नकोच, अशी भूमिका आता आधुनिक दाम्पत्यांनी घेतली आहे. यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी जनजागृती करावी लागली. लोकसंख्या वाढीचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी विशेष कार्यक्रम राबवला जातो. यात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित केले जाते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुरुष किंवा महिला या दोघांपैकी एकाने केली, तरी पाळणा थांबवता येतो. पण पाळणा थांबवण्यासाठी इतरही उपाय केले जातात. परंतु कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कायमस्वरुपी पाळणा थांबवण्यासाठी केली जाते. कुटुंबाच्या तसेच सामाजिक दबावामुळे महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा ५० टक्के कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी अवघ्या ११ पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या आहे. पुरुष नसबंदीसंदर्भात अनेक गैरसमज असल्याने पुरुष कुटुंब नियोजनासाठी धजावत नाहीत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दरवर्षी कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठीचे उद्दिष्ट घेऊन काम करतो. हे उद्दिष्ट पूर्ण करताना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांनाही शस्त्रक्रियेसाठी उद्दीष्ट दिले जाते. त्यानुसार दोन अपत्यांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच तांबी बसवून उपाय योजना केल्याचा स्वतंत्र अहवाल आरोग्य विभाग तयार करते. यावर्षी आरोग्य विभागाला ११,३७२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५६७७ महिलांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत तर केवळ ११ पुरूषांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत.अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखाली असलेल्या महिलांनी शस्त्रक्रिया केल्यास त्यांना शासनातर्फे ६०० रूपये दिले जातात. तसेच इतर महिलांना २५० रूपये दिले जातात. पुरूषांनी शस्त्रक्रिया केल्यास त्यांना १४०० रूपये दिले जातात.

टॅग्स :WomenमहिलाFamilyपरिवारSocialसामाजिकgovernment schemeसरकारी योजना