शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लागतील तेवढी कागदपत्रे देणार; उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: September 6, 2023 21:05 IST

निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जालना : निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असा शासनाचा निरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना दिला. शासनाच्या निर्णयावर आपण सहकाऱ्यांसमवेत चर्चा करुन गुरूवारी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाबाबतचा आपला निर्णय जाहीर करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाने घेलेल्या निर्णयाचा निरोप घेऊन आलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर आज दिवसभर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. ज्यांच्या निजामकालीन नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला जाईल यासह इतर मागण्या मान्य केल्या असून, ५० टक्क्यांहून अधिकची लढाई मनोज जरांगे यांनी जिंकली आहे. गुन्हे परत घेण्याबाबत सकारात्मक शब्द मिळाला आहे. शासनाच्या निरोपावर जरांगे सकारात्मक असून, उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करण्याची वेळ जरांगे यांनी दिल्याचे खोतकर म्हणाले. 

राजेश टोपे म्हणाले...यावेळी आ. राजेश टोपे यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती देत शासनाच्या निर्णयावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी आहेत त्यांना उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र देणे, त्याचा तत्काळ जीआर काढणे, सरसकट महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठा समाजबांधवांना एका महिन्यात कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार, मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आदी शासनाच्या निरोपावर सहकाऱ्यांसमवेत चर्चा करून उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत निर्णय घेऊ, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.

लागतील तेवढी कागदपत्रे देणारमनोज जरांगे यांनी शासनाचा निरोप येण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातील मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाला एका दिवसात अध्यादेश काढता येईल इतके पुरावे आपल्याकडे आहेत. निजामकालीन दस्तऐवजासह इतर कायदेशीर कागदपत्रे आहेत. एका कागदावरही हा अध्यादेश काढता येईल. तुम्ही रिक्षा भरून मागा, टिप्पर भरून मागा तितकी कागदपत्रे देतो. तुम्ही यावे, कागदपत्रे न्यावीत. काढलेला अध्यादेश कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी तज्ज्ञांची टीमही देऊ, असे आवाहन उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी शासनाला केले.

मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चापत्रकार परिषद सुरू असताना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करू, असे सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण