शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत जरांगे थंड, दबाव कुणाचा? म्हणाले, "...तर त्याच्या घरी जाऊन डोक्यात गोटा टाकेन, निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 11:25 IST

...मात्र, एका रात्रीतून ते थंड अथवा शांत झाले आणि त्यांनी निवडणुकीतून सपशेल माघार घेतली!

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत आपणही आपले उमेदवार उतरवणार, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली होती. यानुसार त्यांनी, रविवारी कोण-कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार आणि कोणत्या ठिकाणी उमेदवार पाडणार, यासंदर्भातही माहिती दिली होती. मात्र, एका रात्रीतून ते थंड अथवा शांत झाले आणि त्यांनी निवडणुकीतून सपशेल माघार घेतली. तसेच, निवडून येऊन संपवण्यापेक्षा, पाडून संपवू. दोन्हीतही आम्हाला सारखाच आनंद. असे त्यांनी म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.      

निवडणूक प्रक्रियेत एका रात्रीतून आपण शांत झालात, महायुतीकडून काही दवाव होता, महाविकास आघाडीकडून काही दबाव होता, हे दबावापोटी झाले की आणखी काही? असे विचारले असता जरांगे म्हणाले, "तुम्हाला पत्रकारीतेच्या पलिकडे जाऊन एक गोष्ट माहीत आहे, माझी मान कापली गेली तरी हा नमुना हाताला लागू शकत नाही आणि दबाव म्हटलं, तर डोक्यातच गोटाच घालेन मी त्याच्या. महायुतीचा दवाब आला अथवा महाविकास आघाडीचा दबाव आला, तरी यंत्रनाही त्यांच्या जवळच आहेत आता. मोबाईल फोनही येतात. मला जर फोन आलाना तर त्याच्या घरी जाऊन मी त्याच्या डोक्यात गोटा टाकेन. सोडणार नाही, ते तसले धंदे नाही. यादीच नाही आली (मित्र पक्षांची यादी), आता त्यात काय? आहे ते आहे." 

"निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू; दोन्हीतही आम्हाला सारखाच आनंद" -   "आपण म्हणालात, दबाव आला की काय? तर मी बदलत नाही कधीच. आपण म्हणालात की, निवडणुकीत तुम्हाला उच्चांक गाठायचा होता, त्याचे काय? तर आम्हाला निवडून येऊन वर यायचे होते. आमचे निवडून आले, त्याला पाडले, तो गेला. म्हणजे आम्हाला संपवणाराच संपवायचा होता. त्याला काय, निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू. दोन्हीतही आम्हाला सारखाच आनंद," असे जरांगे  यांनी म्हटले आहे.    

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण