शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागरी समस्यांचा पोळा कोण फोडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:26 IST

काळ्या आईला हिरवा शालू पांघरता यावा म्हणून सर्जा-राजा हे वर्षभर राबराब राबतात या राबणाऱ्या बैलांनाही एक दिवस पोळा सणाच्या निमित्ताने सन्मान देण्यात येतो. त्यांच्यासाठी वर्षातून एकदाच पुरणपोळी केली जाते, त्यांची सजवून मिरवणूक काढण्यात येते. एरवी नेहमी चाबकाचे फटकारे खात ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता आपल्या बळीराजासाठी तो राबराब राबतो. त्याचा सन्मान होत असल्याने भारतीय संस्कृती किती महान आहे, हेच या पोळा सणातून दिसून येते.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काळ्या आईला हिरवा शालू पांघरता यावा म्हणून सर्जा-राजा हे वर्षभर राबराब राबतात या राबणाऱ्या बैलांनाही एक दिवस पोळा सणाच्या निमित्ताने सन्मान देण्यात येतो. त्यांच्यासाठी वर्षातून एकदाच पुरणपोळी केली जाते, त्यांची सजवून मिरवणूक काढण्यात येते. एरवी नेहमी चाबकाचे फटकारे खात ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता आपल्या बळीराजासाठी तो राबराब राबतो. त्याचा सन्मान होत असल्याने भारतीय संस्कृती किती महान आहे, हेच या पोळा सणातून दिसून येते.गावातील सर्व सजविलेल्या बैलांना हनुमान मंदिरा समोर आणून त्यांची सार्वजनिक पूजा केली जाते आणि नारळ फोडून पोळा फुटला असे जाहीर केले जाते. नंतर धन्याच्या घरी बैलांचे औक्षवण केले जाते. आता तुम्ही म्हणाल पोळा सणाचा आणि जालना शहरातील नागरी समस्यांचा संबंध कसा काय जोडता, पोळा या एकाच सणासाठी फुटला हा शब्दप्रयोग केला जातो.तर दुसरे म्हणजे दहीहंडी फुटली असे उच्चारले जाते. हे दोन्ही जवळपास जोडून येतात. त्यामुळे सणाशी नाते जोडले ते जालन्यातील नागरी समस्यांचे या सुटता सुटेनात आणि फुटेनातही अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेले जालना शहर गेल्या पाच वर्षापासून पथदिवे बंद असल्याने अंधारात चाचपडते आहे. गणेश उत्सव, रमजान इद, दिवाळी असे काही सण आल्यावर हे पथदिवे सुरू होतात आणि नंतर पुन्हा जैसे थे. पथदिव्यांप्रमाणेच घनकचरा प्रकल्पाचे झाले आहे. स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या पहिल्या आढावा बैठकीत तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनीविरूध्द गुन्हे दाखल केले जातील अशी घोषणा केली होती. मात्र याला आता साडेतीनवर्ष झाले आहेत. पाणीपुरवठ्याची सध्या ऐन पावसाळ्यातही शहराच्या काही भागात दहा ते पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे. या तीन्ही समस्या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. आणि आता या समस्या सोडविण्याची जबाबादी ही पालिकेची असून, संपूर्ण राज्यात सर्वात जास्त मतांनी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांना जालनेकरांनी निवडून दिले आहे. त्यांच्याकडून आता मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या पातळीवर त्या प्रयत्न करत असल्याचे दिसत असले तरी, त्यात आणखी वाढ करण्याची गरज जनतेतून व्यक्त होत आहे. विरोधी पक्ष असलेले शिवसेना आणि भाजप हे सर्वसाधारण सभेत त्यांच्याशी संबंधित मुद्यांवर थोडाफार गोंधळ करून जोर आजमायीश करतात परंतू नंतर विविध प्रकारच्या विकास कामांवरून सर्वपक्षीयांचे हातात-हात घालून सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे दर्शन घडते.एकूणच विरोधी पक्ष केवळ खासगीत चर्चा करताना आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देऊन मन हलके करतात. परंतु प्रत्यक्षात कोणीच कोणाविरूध्द दोन हात करण्याच्या स्थितीत नसते. राहिला गरीब बिचा-या जनतेचा मुद्दा ती रोजजच्याच आपल्या राहाटगाडग्यातून त्यांना उसंत मिळत नाही. त्यामुळे ना या शहरात आंदोलन होत ना कोणी पेटून उठत. त्यामुळे राजकारणी आणि प्रशासनाचे चांगलेच फावते. चलता है...आणि समस्या हा प्रश्न न संपणारा असतो, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने कोणाचीच भीती अथवा दबावगट नसल्याने जालनेकरांच्या समस्यांचा पोळा फोडणार कोण असा प्रश्न अनुत्तरित राहतो.त्यामुळे मग जालनेकरांचे जगने म्हणजे ठेवीले अनंत तैसेची राहावे या संत वचनाप्रमाणे बनले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcivic issueनागरी समस्या