शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

कुठे खिडक्या तुटल्या, तर कुठे छताला गळती - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:29 IST

दीपक ढोले जालना : शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनातर्फे शासकीय निवासस्थाने दिले जातात ; परंतु, या ...

दीपक ढोले

जालना : शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनातर्फे शासकीय निवासस्थाने दिले जातात ; परंतु, या निवासस्थानांची मागील काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. कुठे खिडक्या तुटल्या तर कुठे छताला गळती असल्याने पोलिसांना किरायाच्या घरात राहत आहे. चांगल्या स्थिती असलेल्या ८१४ पैकी केवळ ४०० घरांमध्येच पोलीस राहत असल्याचे दिसून येत आहे.

दिवसरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जालना जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पोलीस ठाणे व शहराच्या ठिकाणी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. जालना शहरातील रामनगर परिसर व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागे १९५४ साली निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. तेव्हापासून या निवासस्थानांची देखभाल दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे आता ही निवास्थाने मोडकळीस आली असून, याकडे संबंधित विभागाचेही दुर्लक्ष आहे. निवासस्थानांच्या खिडक्या तुडल्या आहेत. तर कुठे छताला गळती लागली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी या निवासस्थानात राहण्यास तयार नाहीत. शहरात किरायाने खोली घेऊन हे पोलीस ‌आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे.

आमच्या प्रतिनिधीने बुधवारी पोलीस कॉलनीची पाहणी केली असता, ही बाब उघडकीस आली. सर्वच काॅलनीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. काही निवास्थानांची दयनिय अवस्था झाल्याचे दिसले. येथे कोणीही राहत नसल्याने ही निवासस्थाने निकामी झाली आहे. याकडे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

ना पाणी ना रस्ते

पोलीस कॉलनीतील सर्वच रस्त्यांची दयनिय अवस्था झालेली आहेत. काही रस्त्यांची तर कामेच झाली नसल्याने वाहने चालवितांना मोठी कसरत करावी लागते. येथील एका महिलेने सांगितले की, आम्हाला १० ते १५ दिवस पाणी येत नाही. त्यामुळे विकतचे पाणी घ्यावे लागते. तर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे तिने सांगितले.

किरायासाठी मिळतात केवळ १९०० रूपये

जे पोलीस कर्मचारी किरायाने राहतात. त्यांना शासनातर्फे किराया दिला जातो. सुरूवातीला एका पोलीस कर्मचाऱ्याला १५०० रूपये मिळायाचे. आता १९०० रूपये मिळत आहे. सध्या एका खोलीसाठी तीन ते साडेतीन हजार रूपये किराया द्यावा लागतो. त्यामुळे शासनाकडून मिळालेला किराया हा अत्यल्प आहे.

काहींनी स्वखर्चातून केली डागडूजी

जे अधिकारी व कर्मचारी पोलीस निवासस्थानात राहतात. त्यांनी स्वत; हा खर्च करून डागडूजी केली आहे. याबाबत एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, मी पोलीस कॉलनीत राहातो. माझ्या घराच्या खिडक्या तुटल्या होत्या. याबाबत मी अनेकवेळा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारी केल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मी स्वत;च खिडक्यांची दुरूस्ती केली.

चौकट

जिल्ह्यातील बहुतांश पोलीस निवासस्थानांची दुरवस्था झालेली आहेत. याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव देखील पाठविला आहे. परंतु, अद्याप त्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली नाही. मंजुरी मिळताच कामाला सुरूवात करू.

विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना

एकूण निवासस्थाने

१००१

दुरवस्था झालेली निवासस्थाने

१८७

एकूण पोलिसांची संख्या

१६३०

निवास्थानात राहत असलेल्या पोलिसांची संख्या

४००