शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पिकेच काय, जमीन पण वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:57 IST

 पूर्णा, धामणा, केळणाचा प्रथमच पाहिला रुद्रावतार

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान 

- प्रकाश मिरगे

जाफराबाद (जि. जालना) : ज्या पावसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, त्या पावसाचा यंदा कहर झाला. अतिवृष्टीमुळे पूर्णा, धामणा, केळणा नद्यांचा रुद्रावतार प्रथमच पाहिला. नदीच्या पुरात पिकेच काय आमच्या जमिनीही वाहून गेल्या. शासन तुटपुंजी मदत करेल; पण अस्मानी संकटात आमचे झालेले नुकसान भरून निघेल का? असा प्रश्न जाफराबाद तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

जाफराबाद तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे बाजरी, मका, कपाशी, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांची बैठक घेऊन दिले. तालुक्यातील १०१ गावांपैकी ४४ गावात पंचनामे झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित दोन दिवसात ५७ गावांचे पंचनामे पूर्ण करणार असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. 

नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जाफराबाद शिवारातील शेतीची पाहणी केली असता विदारक चित्र दिसून आले. अतिवृष्टीमुळे पूर्णा-धामना, केळणा नदीला पूर आला होता. या पुरात पिकासह जमीन वाहून गेली. या अस्मानी संकटाचा कहर बोरखेडी गायकी, सावंगी, टाकली, जाफराबाद, खामखेडा, नळविहरा, निमखेडा, पिंपळखुटा, देऊळझरी येथे पाहावयास मिळाला. 

सर्जेराव वरगणे, सय्यद अब्बास, फकिरबा वरगणे, सय्यद युसूफ, उषा वरगणे, बोरखेडी गायके येथील पंढरीनाथ शामराव गायके आदी शेतकऱ्यांची पिकेच नव्हे तर जमीनही या पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करताना जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकची मदत करावी, अशी मागणी शामराव गायके यांनी केली आहे.

४४ गावांतील पंचनामेतालुक्यातील १०१ गावातील ५८ हजार ८०९ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. आजवर ४४ गावांतील पंचनामे पूर्ण झाले. यात ३० हजार ५८१ हे. क्षेत्रातील २३ हजार ३८६ शेतकऱ्यांना ३३ टक्क्यांपेक्षा अधिक फटका बसला आहे. उर्वरित ५७ गावांतील पंचनामे करण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण होणार असून, अंतिम अहवाल त्यानंतर समोर येईल. -सतीश सोनी, तहसीलदार जाफराबाद

घास हिरावून घेतलाशेतकऱ्यांनी केलेला खर्च पाण्यात गेला असून, तोंडचा घास हिरावून घेतल्याने दिवाळीसुद्धा साजरी करता आली नाही. त्यामुळे शासनाने सरसगट जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करावी.  - कृष्णा मोरे, शेतकरी, नळविहरा

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस