शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात ८२ गावांना ११६ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:48 IST

जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हिवाळ््यातच जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई भासत असून, जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर भोकरदन शहर व तालुक्यात ५९ तर, जाफराबादमध्ये ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्यात यंदा दुष्काळ दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या दुष्काळी परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ११६ टँकर सुरू आहेत. टंचाईस्थिती तीव्र होणार असून दोन महिन्यानंतर जिल्ह्यात हजारो टँकरच्या खेपा करून पाणी पुरवठा करावा लागणार आहे.जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात या वर्षी अत्यल्पच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके आली नाहीत व रबीची पेरणी झाली नाही. जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे. पावसाळ्याचे चार महिने कोरडे गेले असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. येत्या काळात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ११६ टँकर सुरू आहेत. तर जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भोकरदन शहरात २०, तर तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जाफराबाद तालुक्यात ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहेत.पाणीपुरवठा करण्याचे आव्हानकाही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. तेव्हा त्यांनी टंचाईस्थितीचा आढावा घेतला होता. जिल्ह्यात आगामी काळात जास्त अंतरावरून पाणीपुरवठा करावा लागेल, असे सांगून त्यांनी प्रशासनास कामाला लावले. जिल्ह्यात जरी सध्या ११६ टँकर सुरू असले, तरी फेब्रुवारी, मार्चमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार मार्चनंतर जिल्ह्यातील ९०८ गावांत पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ