शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातील पाणी जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:52 IST

जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला असून, प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला असून, प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी अंबड तालुक्यातील वडीगोद्रीसह इतर गावांमधील कॅनॉलमध्ये सोमवारी दाखल झाले. कॅनॉलला पाणी आल्याने या भागातील हजारो हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून, दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जालना जिल्ह्यात यंदा अपेक्षित असा मोठा पाऊस झालेला नाही. अंबड व घनसावंगी तालुक्यातही परिस्थिती तशीच आहे. पावसाअभावी काही ठिकाणी खरिपाची दुबार पेरणी झाली. गत काही दिवसांमध्ये पडलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. परंतु फळबाग व ऊस पिकासाठी अधिक पावसाची गरज आहे. गोदाकाठच्या गावात आजही जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीव्र असून, गावा-गावातील पाणीटंचाईही कायम आहे. जायकवाडी जलाशयातून शेतीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक व अहमदनगर परिसरात मोठया प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे मराठवाडयासाठी जीवनदायिनी असलेला जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. पाणी दाखल झाल्याने शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.या गावच्या शिवारात पाणीअंबड तालुक्यातील भांबेरी, दह्याला, नालेगाव, अंतरवाली, सराटी, वडीगोद्री, आपेगाव, बळेगाव, साष्ट पिंपळगाव, चुर्मापुरी, महाकाळा, पाथरवाला खुर्द, बुद्रूक, घुंगर्डे हादगाव, करंजला, पिठोरी शिरसगाव, एकलहेरा, तीर्थपुरी, भारडी आदी गावांना डाव्या कालवा व त्याच्या वितरिकांमार्फत पाणीपुरवठा केला जातो.या गावांच्या शिवारातील लाखो हेक्टरवरील पिकांना या पाण्याचा लाभ होणार आहे. शिवाय जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे.मोठ्या पावसाची प्रतीक्षादमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट कायम असून, इतर जलस्त्रोतांची अवस्थाही बिकट आहे. पाणीप्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमआहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र