शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, मनोज जरांगे यांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 14:11 IST

फडणवीस साहेब, आम्ही अजून तुम्हाला शत्रू किंवा विरोधक मानलं नाही, तुम्ही समजून घ्या, दरेकरच ऐकून डाव खेळू नका- मनोज जरांगे

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : गोरगरिबांच्या दारात हे आले पाहिजे, आपण नाही जायचं. मराठा समाजाला आवाहन आहे की दरेकरांच्या अभियानात सहभागी होऊ नका, त्यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी रात्री माहीम,अंधेरी पूर्व, मलबार हिलला देखील बैठक घेतली. दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, असे सुचक वक्तव्य मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केले. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

जरांगे पुढे म्हणाले, माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मी तुम्हाला मॅनेज होऊ शकत नाही. मराठ्यांच आंदोलन चिघळण्याचा डाव दिसत आहे. फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला आणखी शत्रू आणि विरोधक मानलं नाही. तुम्ही समजून घ्या, दरेकरच ऐकून डाव खेळू नका, असा इशारा जरांगे यांनी देवेंद्र फडणविस यांना दिला. 

विद्यार्थ्यांना ईएसबीसी,ओबीसी आणि ईडब्ल्यूएस तिन्ही आरक्षण ठेवावे. खोटी आश्वासन देऊन मुलीबाळींना फसू नका. मुलीना मोफत शिक्षणासाठीच्या अतिशर्थी रद्द करा. आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या झाल्या त्यांना तातडीने मदत आणि नोकरी द्या, हे सगळे विषय थोड्यावेळापूर्वी मंत्री शंभूराजे देसाई यांना सांगितले असल्याचे जरांगे म्हणाले. तसेच सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली त्याबद्दल समाजाच्यावतीने आभार, त्यांचे कौतुक आहे. मात्र, मुदतवाढ देऊन काम होत नाही. त्यांना काम करायला लावा, नुसत मुदतवाढ देऊन काही अर्थ नाही, असेही जरांगे म्हणाले. 

मराठा आता पक्षाला महत्त्व देत नाही त्यांना पक्षात राहायची इच्छा राहिली नाही आता लढा सामान्यांच्या हातात आहे. आता टेन्शन घेत नाही. आता लवकर पर्दाफाश होणार आहे. १२ टे १३ संघटना दरेकरांनी फडवणीसांच्या सांगण्यावरून जमा केल्या आहेत. सरकारला वाटत ना विरोधी पक्ष बोलत नाही मला एक कळलं नाही त्यांच्या दारात आपण का जायचं, सरकारनं जावं ना मराठ्यांनी का ? करावा चपराशीपणा तुम्ही जाना मराठा समाजाचा जाब विचाराची ताकद आहे उद्धव ठाकरेच्या बंगल्यावर मराठा आंदोलन गेले यावरून सरकारला टोला लगावला.

सरकारला सल्ला भाजप अतिचतुर नेत्यांचा पक्ष आहे. त्यांच्या आता लक्षात आलं की मराठे फोडायचे असेल तर याला संपावं लागतं. मराठ्यांची एकजूट आणि चळवळ बदनाम करू नका. नसता मराठ्यांना तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. मराठ्यांची धास्ती नाही घ्यायची तर कोणाची घ्यायची . मराठ्यांना आरक्षण देऊन टाका कसलेच समीकरण जुळवायची गरज नाही असा सरकारला सल्ला दिला. 

प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्यावर... आपली आघाडी नाही,काही नाही ,गोरगरिबांनी एकत्र यायचं आणि देणार बनवायचं शेवटची संधी आली अशी संधी पुन्हा येणार नाही विधानसभा निवडणूक शंभर टक्के लढणार आहे गोरगरिबांची लढाई यावेळेस होणार आहे,आता सर्व सामान्यांची लाट येणार आहे असे राजु शेट्टी च्या भेटीवर जरांगे म्हणाले. जरांगे पाटील यांनी २८८ उमेदवार उभे करावे असे प्रकाश आंबेडकर बोलले होते यावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले २८८ जागा लढणारच आहे,त्यांचा सल्ला प्रत्येक वेळेस आम्ही मानत आलो त्यांनी सांगितलं मराठा समाज त्यांना मानतो त्यांनी गरिबाच्या आणि गरजवंताच्या बाजूने राहावं एवढी अपेक्षा आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpravin darekarप्रवीण दरेकर