विष्णूच्या दशावताराने जालनेकर मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:45 AM2018-09-23T00:45:41+5:302018-09-23T00:46:17+5:30

दरवर्षी विविध प्रकारचे देखावे सादर करुन हजारो गणेशभक्तांना आकर्षित करणाऱ्या चमनचा राजा गणेश मंडळाने यावर्षी भगवान विष्णूच्या दशावताराच्या देखावा सादर करुन जालनेकरांचे लक्ष वेधले आ

Vishnu's Dashavtar in Ganesh festival | विष्णूच्या दशावताराने जालनेकर मंत्रमुग्ध

विष्णूच्या दशावताराने जालनेकर मंत्रमुग्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दरवर्षी विविध प्रकारचे देखावे सादर करुन हजारो गणेशभक्तांना आकर्षित करणाऱ्या चमनचा राजा गणेश मंडळाने यावर्षी भगवान विष्णूच्या दशावताराच्या देखावा सादर करुन जालनेकरांचे लक्ष वेधले आहे.
शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाºया चमनच्या राजाचे हे २९ वर्षे आहे. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात चमनचा राजा गणेशमंडळाव्दारे विविध नयनरम्य देखावे सादर केले जातात.
जालनेकरांना देवाचे दर्शन घडावे, हा गणेश मंडळाचा प्रयत्न असतो. हे देखावे पाहण्यासाठी जालनेकरही मोठी गर्दी करतात.
या अगोदर मंडळाने श्रीकृष्णावतार, शिर्डी येथील साईबाबा मंदिराची प्रतिकृती, तामिळनाडूतील पद्नाभन मंदिराचा देखावा, वेलूर येथील महालक्ष्मी, तिरुपती बालाजी मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा देखावा, सागर मंथन, भद्रा मारुती मंदिराचा देखावा सादर केला होता.
यावर्षी मंडळाने तामिळनाडू येथील पाप नाशक मंदिराचा हुबेहूब देखावा साकार केला असून, हा देखावा पाहाण्यासाठी जालनेकर मोठी गर्दी करीत आहे विशेष म्हणजे, शाळकरी मुलेही हा देखावा पाहाण्यासाठी गर्दी करीत आहे.
या देखाव्याच्या माध्यमातून भगवान विष्णूंच्या दशावतारांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये मत्स्यावतार, कच्छावत्तार, वराहअवतार, सिंहावतार, वामनावतार, परशुरराम अवतार, श्रीरामावतार, बलरामावतार, श्रीकृष्णावतार, व अश्वावताराच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहे. हा देखावा अंजली आर्टच्या कलाकारांनी सादर केला असल्याची माहिती गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी दिली आहे. दरम्यान, मंडळाच्यावतीने दहा दिवस विविध उपक्रम घेतले जातात.

Web Title: Vishnu's Dashavtar in Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.