शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Video: मराठवाड्यात उल्कापात ? अनेक भागात आकाशात दिसले लक्षवेधी दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 21:14 IST

औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात नागरिकांना दिसले दृश्य

जालना/औरंगाबाद : जालना शहरासह जिल्ह्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, अजिंठा,सोयगाव, सिल्लोडमध्ये शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आकाशातून आग लागलेली वस्तू जमिनीवर कोसळत असल्याचे नागरिकांना दिसले. याचा व्हिडिओ व्हायरला झाला असून, या उल्का असल्याचे बोलले जात आहे. असेच दृश्य परभणी जिल्ह्यातील येलदरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथेही दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

शनिवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असावा. जालना शहरासह जिल्ह्यातील भोकरदन, मंठा, टेंभुर्णी, गोंदी, घनसावंगी, आदी ठिकाणी हा प्रकार दिसून आला. अनेकांनी हे दृश्य आपआपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. अवघ्या काही मिनिटांत ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याबाबत जालना अपर जिल्हाधिकारी केशव नेटके यांना विचारले असता, ते म्हणाले की, या प्रकरणाची माहिती प्रशासन घेत असून, तो उल्का असेल तर त्याची माहिती तज्ज्ञच देऊ शकतात. एखाद्या शेतात पडल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

रात्री 8 ते 8. 30 वाजेच्या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा, सोयगाव, सिल्लोड येथून जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा, कोदा, जळगाव सपकाळ, हिसोडा, पिंपळगाव रेणुकाई या गावातील नागरिकांना उल्कापात सदृश्य दृश्य दिसले. असेच दृश्य रात्री 7. 45 वाजता येलदरी ता जिंतूर परिसरात येलदरी जलाशयाच्या वरून पश्चिम दिशेकडुन पूर्वेकडे जातांना दिसले. एका मागून एक तीन ते चार उल्का दिसून आल्या, सदर दृश्य पहिल्यांदाच दिसल्यामुळे अनेकांनी वेगवेगळे तर्क लावले, एखाद्या मिसाईल सारखे हे दृश्य दिसले आणि तेही येलदरी धरणाच्या दिशेने जात असल्यामुळे काही क्षण भीती देखील निर्माण झाली होती मात्र या उल्का काही क्षणात नाहीश्या झाल्या, आकाशातून असे काही प्रकार अनेकदा घडत असतात तसाच एखादाप्रकार हा असू शकतो असे समजून नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले.

दुर्मिळ घटना, अनोळखी वस्तू आढळल्यास जमा कराआकाशातून नेहमीच कधी-तरी लहान-मोठ्या प्रमाणात उल्कापात होतच असतो; परंतु, पाहिलेल्या व्हिडिओनुसार अचानकपणे एकाच वेळी चार ते पाच उल्का पृथ्वीवर पडताना दिसतात. ही दुर्मीळ घटना म्हणता येईल. ज्या कोणाच्या शेतात या उल्कांचा दगड आढळून आल्यास तो त्यांनी आवकाश संशोधन केंद्राकडे सुपुर्द करावा; जेणेकरून शास्त्रज्ञांना त्याचा अधिक अभ्यास करता येईल.- सुरेश केसापूरकर, खगोल अभ्यासक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादscienceविज्ञानJalanaजालनाparabhaniपरभणी