शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

शाळा, महाविद्यालयांमध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 00:32 IST

जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांसह इतर ठिकाणी रविवारी जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांसह इतर ठिकाणी रविवारी जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.अंगणवाडी केंद्र, वडीगोद्रीवडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मातोश्री रमाबाई आंबेडकर अंगणवाडी क्र. १ मध्ये आयोजित कार्यक्रमास माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सीताबाई गांगुर्डे, स्वाती गावडे, मीराबाई नरवडे, मालनबाई पटेकर, रमाबाई गांगुर्डे, मंगलबाई गांगुर्डे, मनीषा खैरे, दीक्षा घागरे, प्रियंका गांगुर्डे, कोमल गांगुर्डे, वैष्णवी गांगुर्डे, वैष्णवी पवार आदींची उपस्थिती होती.समर्थ कृषी महाविद्यालयदेऊळगाव राजा : येथील समर्थ कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी जि. प. अध्यक्षा नंदा कायंदे, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. स्वेता धांडे यांनी मार्गदर्शन केले. स्वत: ला शिद्ध करायचे असेल तर अंगी जिद्द आणि चिकाटी बाळगावी. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे. जणेकरून कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांना माघार घेण्याची वेळ येणार नाही तसेच कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही, असे नंदा कायंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाला वैष्णवी दाभडकर, योगिता दोनाडकर, योगिता रायबोले, रेवती घायाळ, रितिका रामटेके, वैष्णवी शिंगणे, पूजा खडे, निकिता पांढरे, अश्विनी ताठे, भाग्यश्री भटकर, प्रणाली फरकुंडे, स्नेहा शिरकुरे यांच्यासह विद्यार्थिंनींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन करून आभार पूनम अघाव यांनी मानले.नेहरू युवा केंद्र, रामनगररामनगर : येथील नेहरू युवा केंद्र व क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरेगाव यांच्या वतीने रामनगर येथे आयोजित कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ, उषा शिंदे, अयोध्या टेमकर, ग्रामसंघाच्या अध्यक्षा गेदाबाई मोकाटे, मंदाकिनी शेळके, अनघा मोरे, मीना पांडोले आदींची उपस्थिती होती. विष्णू पिवळ यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.जि.प. शाळा, सारवाडीजालना : तालुक्यातील सारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमास राजमाता जिजामाता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महिलांचा सत्कारही करण्यात आला. विद्यार्थिंनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका लता चव्हाण, विमल काळे, सुशीला काळे, बेबी काळे, विश्वलता गायकवाड, जनाबाई भुंबे, दीपा उंचेकर, ज्ञानेश्वर गिराम, अनंतकुमार शिलवंत आदींची उपस्थिती होती.महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात - शीतल कुचेबदनापूर : महिलांनी ठरवले तर प्रत्येक क्षेत्रात महिला भरारी घेऊ शकतात. महिलांनी कुणालाही न घाबरता आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करावे, असे आवाहन शीतल कुचे यांनी केले. बदनापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका एल. डी. मुंढे, मुख्याध्यापिका गवई, स्वाती रांदड, शीतल सोनवणे, संगीता पाटोळे, प्रतिभा साबळे, वंदना शेळके, नीता पिंपरखेडकर, वैशाली सपकाळ, शेख आयेशा, प्रणिता दाभाडे, वंदना मगरे आदींची उपस्थिती होती.जि.प. शाळा, वरखेडा सिंदखेडजालना : तालुक्यातील वरखेडा सिंदखेड येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गणेश शेवाळे, वर्षा खरात, पुंडलिक बोडखे यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच वर्षा खरात व शिक्षिका स्नेहलता निर्मळ यांना ‘आदर्श नारी पुरस्कार’ देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एस. बी. खांडेभराड, बी. आर. जाधव, ए. के. डोइफोडे, व्ही. आर. मुंढे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बी. आर. जाधव यांनी केले. आभार एस. बी. खांडेभराड यांनी मानले.जि. प. शाळा, नूतन वसाहतजालना : बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील नूतन वसाहत जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जागतिकीकरणात महिलांनी गरूड झेप घेतली आहे. परंतु, राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या मार्गाने जाणे हे आपले कर्तव्य असल्याचे मुख्याध्यापक संजय हेरकर यांनी सांगितले. याप्रसंगी सुमन सोनवणे, माया बोर्डे, मंदा घोरपडे, मिरा बोर्डे, ज्योती घोरपडे, कावेरी सोनवणे, संगीता घोरपडे, मंगल खंडाळे, जया घोरपडे आदींची उपस्थिती होती.छत्रपती पब्लिक स्कूल, केदारखेडाकेदारखेडा : येथील छत्रपती पब्लिक स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमास मुख्याध्यापक गणेश सोळुंके, सरपंच इंदूबाई मुरकुटे, रेशमबाई मुरकुटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी वर्षा गव्हाणे, सुजाता काळे, सुवर्णा सोळुंके, गणेश सोळुंके, दया पवार, विद्या नागलोत यांची उपस्थिती होती.दे.राजा हायस्कूलदेऊळगाव राजा : येथील देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये सोनपरी दंदाले व तेजिका वनवे या विद्यार्थिनींनी अनुक्रमे एक दिवसासाठी प्राचार्य व उपप्राचार्य पदाचा पदभार सांभाळला. प्राचार्य डी. बी. राजपूत यांनी सर्व शिक्षिका, विद्यार्थिनी व उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डी. बी. राजपूत, उपप्राचार्य प्रा. पी. डी. भौरकर, पर्यवेक्षक आर. बी. कोल्हे, डी. ए. खांडेभराड आदींची उपस्थिती होती.जीवनराव पारे विद्यालय, चंदनझिराचंदनझिरा : येथील जीवनराव पारे विद्यालयात आयोजित कार्यक्रमात सहशिक्षिका सुषमा काळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. निकीता ढेम्पे, पायल भुंबर, निकीता खांडेभराड, सायमा मोगल, सुमया पठाण, राणी चव्हाण, नेहा भुंबर, श्रेयशी रत्नपारखे या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आजची स्त्री या भित्तिपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन निकीता खांडेभराड यांनी केले. आभार पायल भुंबर यांनी मानले.ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल, वखारीजालना : तालुक्यातील वखारी येथील ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रोहिणी क्षीरसागर, एम. ए. भालमोडे, व्ही. बी. खैरे, अर्चना खैरे यांच्यासह पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. बी. घोलप, एम. आर. शिंदे, एस. ए. गिराम, एस. जी. वाजगे, उज्ज्वला जारे, पी. एम. राजमाने, बाली सोळंखे, ए. ए. राठोड, एस. एन. सरोदे, व्ही. के. म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.गुरुदेव इंग्लिश पब्लिक स्कूलजालना : तालुक्यातील भिलपुरी येथील गुरुदेव इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी, संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य अनिता गोरे, डी. एल. भुतेकर, शिवकन्या गायके, संगीता नागरे, सीमा गोरे, सायमा शेख यांच्यासह महिला शिक्षिकांची उपस्थिती होती.श्री गणपती इंग्लिश स्कूलभोकरदन : येथील श्री गणपती इंग्लिश व मराठी प्रि- प्रायमरी स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमास नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, नगरसेविका निर्मला भिसे, गयाबाई जाधव, सामाजिक कार्यकर्त्यां मनिषा जाधव, प्राचार्य तांबारे, मुख्याध्यापक रोजेकर, लता गायके यांची प्रमुख उपस्थिती होती.जि.प. शाळा, दगडवाडीभोकरदन : तालुक्यातील दगडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आर. एन. इंगळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थिंनींनी शिक्षिकांचा सत्कार केला. शिक्षिका जिजा वाघ यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगून सावित्रीच्या लेकी हे गीत सादर केले. याप्रसंगी मुख्याध्यापक आर. एन. इंगळे, पुंडलिक सोनुने, ए. जे. शेख, समीर गराडे, दयाराम कलंबे, अर्जुन वाघमारे यांची उपस्थिती होती.संस्कार प्रबोधिनी विद्यालयजालना : येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी रेखा हिवाळे शिल्पा गऊळकर, कीर्ती कागबट्टे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी भीती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. निबंध स्पर्धेत २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर मुलींवर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक रामदास कुलकर्णी, मुख्याध्यापक ईश्वर वाघ, किरण धुळे, माणिक राठोड, रशीद तडवी आदींनी परिश्रम घेतले.लायन्स क्लबतर्फे महिलांचा सत्कारजालना : शहरातील लायन्स क्लबतर्फे घरगुती काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाणपोईचेही उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पुरुषोत्तम जयपुरिया, राजेंद्र बजाज, मधुकर पवार, मोहन इंगले , खुशाल शर्मा आदींची उपस्थिती होती.शांतिनिकेतन विद्यामंदिरजालना : येथील शांतिनिकेतन विद्यामंदिरमध्ये आयोजित कार्यक्रमास डॉ. चारुस्मिता हवालदार, डॉ. सोनाली जेथलिया, डॉ. रेणुका भावसार, संस्थेच्या संचालक शोभा अंबेकर यांची उपस्थिती होती. आज मुली या मुलापेक्षा कुठेही कमी नाहीत.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनSocialसामाजिक