शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन शहरात विविध उपक्रमांनी संत नरहरी जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:50 IST

संत शिरोमणी नरहरी महाराजांचा आदर्श डोळ््यासमोर समोर ठेवून प्रत्येकाने समाजकार्य करण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन आ. संतोष दानवे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : संत शिरोमणी नरहरी महाराजांचा आदर्श डोळ््यासमोर समोर ठेवून प्रत्येकाने समाजकार्य करण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन आ. संतोष दानवे यांनी केले.शहरातील सराफा असोसिएशन आणि सोनार बांधवांतर्फे श्रीकृष्ण मंगल कार्यालयात संत नरहरी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त गुणंवत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, मनिष श्रीवास्तव, हभप. संतोष महाराज आढावणे, महादूसिंग राजपूत, रणवीरसिंह देशमुख, हुकुमसिंह चुडावत यांची उपस्थिती होती. समाजबांधवांनी संत नरहरी महाराजांच्या विचारानुसार मार्गक्रमण करावे, असे दानवे यांनीसांगितले. यावेळी नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी जयंतीनिमित्त समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बेघर झालेल्या नागरिकांना सर्वांनी एकत्र येऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांतर्फे सराफा बाजारपासून वाजत- गाजत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोहन हिवरकर, मनोज दुसाने, नवथान खरोटे, किशोर सराफ, नंदू पवार, कृष्णा हिवरकर, किशोर हिवरकर, अशोक सराफ, वसंत सराफ, शारदा हिवरकर, रोहिणी सराफ, गंगाताई हिवरकर, सुरेखा पळसकर आदीसह समाजबांधवांची उपस्थिती होती.

टॅग्स :SocialसामाजिकcommunityसमाजStudentविद्यार्थी