नित्याच्याच वाहतूक कोंडीने जालनेकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:02 AM2019-10-15T01:02:04+5:302019-10-15T01:04:20+5:30

वळण रस्त्याचा अभाव असल्याने अनेक मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी ही जालनेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

As usual, traffic jolted Jalenkar | नित्याच्याच वाहतूक कोंडीने जालनेकर त्रस्त

नित्याच्याच वाहतूक कोंडीने जालनेकर त्रस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यातच वाढलेली दुचाकी तसेच चारचाकी वाहनांमुळे आहेत, ते रस्ते अपुरे पडत आहेत. वळण रस्त्याचा अभाव असल्याने अनेक मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी ही जालनेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
शहर वाहतूक शाखेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न करून पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी वर्षभर रस्त्यावर उतरून जालन्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु जागोजागी पार्किंगची व्यवस्था नसल्याने नवीन जालना तसेच जुना जालना भागातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.
वाहतुकीची कोंडी सुटावी, यासाठी एकेरी मार्ग वापरण्यासाठीचे प्रयत्न झाले. परंतु पाणीवेस परिसरातून राजमहल चित्रपटगृहाकडून जाणाऱ्या वळण रस्त्याची दयनीय अवस्था आजही कायम आहे.
या भागातून चारचाकी आणि दुचाकी चालविणे अवघड होऊन जाते.
जागोजागी असलेले खड्डे आणि अरूंद रस्ता यामुळे हा मार्ग वाहनधारक वापरण्यास टाळतात.
जालना शहरात १९८८ नंतर मास्टर प्लॅन झालेले नाही.
कादराबाद, नेहरू रोड इ. भागातील मास्टर प्लॅन करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु ज्यांची घरे या मास्टर प्लॅनमध्ये जाणार आहेत. त्यांना बाजार भावाप्रमाणे मावेजा देण्यासाठी कोट्यवधी रुपये लागणार आहेत.
याची तरतूद आगामी काळात केल्यासच हे शक्य होणार आहे.
आज जे रस्ते आहेत, त्यात प्रामुख्याने जुना जालना भागातील शनी मंदिर चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गांधी चमनहून रेल्वेस्टेशनमार्गे मोतीबाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविणे शक्य आहे.
तसेच मोतीबागेकडून शनी मंदिरकडे येणारी वाहतूक ही मुक्तेश्वर वेशीपासून रेल्वेस्टेशनमार्गे गांधी चमनकडे वळविता येते. यासाठीचे लक्ष वाहतूक शाखेने घालावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील विविध चौकांमध्ये शहर वाहतूक शाखा आणि जालन्यातील उद्योजकांच्या सहकार्याने स्वयंचलित सिग्नल बसविण्याचे काम सुरू आहे.
सोमवारी शिवाजी महाराज चौकात हे सिग्नल बसविण्यात आले. यासाठी जालना पालिकेचीही मदत होत असल्याची माहिती पो.नि. काकडे यांनी दिली.

Web Title: As usual, traffic jolted Jalenkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.