शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी जपून वापरा, जालना जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा

By विजय मुंडे  | Updated: April 4, 2023 16:37 IST

टंचाई निवारणार्थ सहा कोटींचा आराखडा; मध्यम प्रकल्पांमध्ये ४० टक्के उपयुक्त साठा

जालना : जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांमध्ये ३५.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यात मध्यम प्रकल्पात ४० टक्के तर लघू प्रकल्पांत ३५.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. संभाव्य पाणीटंचाई पाहता जिल्हा प्रशासनाकडून सहा कोटी ४४ लाखांचा टंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे.

गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प व ५७ लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. नंतरच्या काळात शेतीसह ग्रामीण भाग, शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्पांतून पाण्याचा उपसा झाला आहे. यंदा फेब्रुवारी, मार्च या महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक जाणवली नाही; परंतु, एप्रिलच्या प्रारंभी उन्हाचा पारा ३६ अंशाच्या वर गेला आहे. उन्हाच्या वाढत्या झळा आणि प्रकल्पांतील कमी होणारा पाणीसाठा पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने एप्रिल ते जून या कालावधीतील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. ५१४ गावे आणि दोन वाड्यांसाठी ५१५ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यासाठी सहा कोटी ४४ लाख रुपये अंदाजित खर्च लागणार आहे.

यात जालना तालुक्यातील १५५ गावांसाठी एक कोटी ६८ लाख ६६ हजार, बदनापूर तालुक्यातील ६७ गावांसाठी ९४ लाख ५६ हजार, अंबड तालुक्यातील १५ गावे, दोन वाड्यांसाठी ५७ लाख १२ हजार, घनसावंगी तालुक्यातील ५० गावांसाठी ९१ लाख रुपये, मंठा तालुक्यातील ५४ गावांसाठी ५६ लाख ५२ हजार, भोकरदन तालुक्यातील १११ गावांसाठी ९६ लाख तर जाफराबाद तालुक्यातील ६२ गावांसाठी ७९.३२ लाख रुपयांचा संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.

११ प्रकल्पात मृत पाणीसाठाजिल्ह्यातील ११ प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे. १९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणी आहे. १९ प्रकल्पांत २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्तसाठा आहे. तर केवळ १४ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती: प्रकल्प उपयुक्तसाठाकल्याण गिरिजा- ६६.३९%कल्याण मध्यम - ७३.३२%अपर दुधना - ५९.६७%जुई मध्यम - १७.०८%धामना मध्यम- २५.३८%जिवरेखा मध्यम - ३१.१६%गल्हाटी मध्यम ००.००%

टॅग्स :WaterपाणीJalanaजालनाdroughtदुष्काळ