शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकऱ्यांना तातडीने मदत करा..."; मनोज जरांगे यांचा शेतातून थेट कृषिमंत्री मुंडेंना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 19:05 IST

मनोज जरांगे यांच्याकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी 

वडीगोद्री ( जालना) : मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी सूरु आहे. घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव या गावांमध्ये  दुपारी त्यांनी पाहणी केली. थेट चिखलामध्ये जात जरांगे यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहून जरांगे यांनी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती केली. 

पुणे आणि माणगाव येथील दौरा करून मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे आज आगमन झाले. जरांगे यांनी लागलीच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जरांगे यांनी पाहणी दौरा सुरू केला आहे. बांधावर न जाता थेट गुटघाभर चिखलात जाऊन त्यांनी पाहणी केली. आज जितकं शक्य होईल तितकं शेतकऱ्यांच झालेल नुकसान बघणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पाहून जरांगे यांनी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका शेतामधूनच फोन केला. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती त्यांनी यावेळी कृषिमंत्र्यांकडे केली. कृषिमंत्री मुंडे यांनी देखील सरसकट शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचा आश्वासन दिल्याचे जरांगे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका"शेतकऱ्यांची सहनशीलता सरकारने पाहू नये. माझ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वेदना आहेत, त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पण काळजी करू नका, नुकसान भरपाई यांच्या छाताडावर बसून घेणार आहे." असे आश्वासन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना धीर देताना ते म्हणाले की, "आज जितके शक्य आहे, तितके मी फिरणार आहे. मी राजकारणी नाही की दौरा लिहून घेईन, जे रस्त्यात दिसेल त्या नुकसानीची मी पाहणी करणार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळवणार."

टॅग्स :JalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडे