शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, गावाकडे हाताला काम नसल्याने बेरोजगार युवकाने संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:57 PM

Unemployed youth commits suicide in Jalana लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, गावाकडे काम नसल्याने बेरोजगार युवकाची आत्महत्या

ठळक मुद्देयुवकाच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले आणि नोकरी गेली.गावाकडे आल्यानंतर काही दिवसांपासून त्याच्या हाताला काम नव्हते.

भोकरदन (जालना) : कंपनीतील गेलेली नोकरी, गावात हाताला न मिळणारे काम आणि घरातील अडचणी सोडविण्याचा प्रश्न यामुळे चिंतित झालेल्या एका २२ वर्षीय बेराेजगार युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सुरंगळी (ता. भोकरदन जि. जालना) येथे मंगळवारी सकाळी समोर आली.

समाधान साळुबा फोलाने (२२) असे मयत युवकाचे नाव आहे. सुरंगळी येथील समाधान फोलाने याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. समाधान फोलाने याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. घरातील परिस्थिती जेमतेम. त्यात दीड एकर शेतीतूनही उत्पन्न मिळत नव्हते आणि घरातील प्रश्नही सुटत नव्हते. त्यामुळे समाधान फोलाने हा तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील कंपनीत कामाला गेला होता. तेथे काम करून येणाऱ्या पगारातून सुरंगळी येथील कुटुंबाला मदत करीत होता. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले आणि समाधानची नोकरी गेली. गावात आल्यानंतर काही दिवस शेतात तर काही दिवस इतर ठिकाणी जाऊन तो काम करीत होता. मात्र, गत काही दिवसांपासून त्याच्या हाताला काम नव्हते. कंपनीतही नोकरी मिळेल की नाही ? याची चिंता त्याला होती. त्यामुळे समाधान चिंतित होता. याच चिंतेतून समाधानने सोमवारी रात्रीच्या सुमारास राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मंगळवारी सकाळी तो उठला नसल्याने नातेवाईकांनी त्याला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांनी आतमध्ये पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे समोर आले. पंचनाम्यानंतर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तपास पोलीस नाईक एन.एस. जाधव हे करीत आहेत.

नातेवाईकांचा आक्रोशघरातील समस्या सोडविण्यासाठी समाधान औरंगाबादेतील कंपनीत काम करीत होता. कोरोनामुळे तो गावात येऊन राहू लागला. मात्र, हाताला काम नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्याच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याcorona virusकोरोना वायरस बातम्याJalanaजालना