शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:47 IST

कुंभेफळ येथे पाच युवक तलावात पोहण्यासाठी गेले होते. यात तलावात उतरलेले दोन महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरापासून जवळच असलेल्या कुंभेफळ येथे पाच युवक तलावात पोहण्यासाठी गेले होते. यात तलावात उतरलेले दोन महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. विकास नारायण राठोड ( १८, रा. चंदनझिरा ) व नवनाथ प्रभाकर जाधव (१८, कुंभेफळ) अशी बुडालेल्यांची नावे असल्याची माहिती श्रीकांत भुजबळ यांनी दिली. सायंकाळी अंधार पडल्यामुळे दोघांचाही तलावाच्या पाण्यात शोध घेण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.अंबड रोडवरील जुन्या सूतगिरणी परिसरात कुंभेफळ येथे गावाला लागूनच तलाव आहे. हा तलाव सध्या पाण्याने तुडुंब भरलेला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास विकास राठोड, नवनाथ जाधव, स्वप्नील ठानगे, ईश्वर रायमल आणि पवन संत्रे हे पाच तरुण कुंभेफळ शिवारात फिरण्यासाठी गेले होते.तलाव परिसरात फिरून बोरे खाल्यानंतर यातील विकास व नवनाथ पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र, दोघांनाही पोहता येत नव्हते. अचानक खोल पाण्यात गेल्यामुळे दोघेही बुडायला लागले. सोबत असलेल्या इतर तिघांनी आरडाओरडा करत विकास व नवनाथ यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. घटनेबाबत तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. तालुका ठाण्याचे सहायक निरीक्षक आर. पी. जोगदंड, कॉन्स्टेबल पवार हे घटनास्थळी पोहोचले. विकास व नवनाथचे नातेवाइकांना माहिती मिळाल्यावर ते देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण केले होते, मात्र, सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा आला. दोन्ही तरुणांचा बुधवारी सकाळी नावेच्या साहाय्याने शोध घेतला जाणार आहे.अनेकांनी दिल्या भेटीदरम्यान घटनेची माहिती मिळताच जालन्याचे तहसीलदार भुजबळ, मंडळ अधिकारी हरी गिरी तसेच तलाठी गिरी यांनी भेट देऊन पाहणी केली.कुंभेफळ येथील उपसरपंच बाळासाहेब शिरसाट यांनी अग्निशमन यंत्रणेसह तलाठ्यांना ही माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेAccidentअपघातWaterपाणी